खुनी खेल! सुट्टीवर आलेल्या लष्कराच्या जवानाची हत्या; प्रेयसीच्या नवऱ्यानेच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Army Man

खुनी खेल! सुट्टीवर आलेल्या लष्कराच्या जवानाची हत्या; प्रेयसीच्या नवऱ्यानेच...

अलीगढ: दिवाळी साजरी करण्यासाठी नुकत्याच घरी आलेल्या २४ वर्षीय लष्कराच्या जवानावर त्याच्या प्रेयसीच्या पतीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात जवानाचा मृत्यू झाला. मृत जवान पंजाबममध्ये पोस्टिंगवर होता. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Target Killing : टार्गेट किलिंगच्या भीतीने काश्मिरी पंडितांनी सोडलं गांव

पीडित, बिकन कुमार हे काकासोबत रविवारी रात्री त्यांच्या कारमधून अलिगढला जात असताना आठ जणांनी त्यांच्यावर लाठ्या आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यानंतर जवानाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितले. टप्पल पोलीस हद्दीतील रसूलपूर गावात ही घटना घडली.

हेही वाचा: "अजित पवार मुख्यमंत्री झाले तर राज्याला फायदा होईल"

कुमारचे वडील जनता सिंह म्हणाले, "माझा मुलगा आणि एका आरोपीच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे प्रेयसीचा पती विजयपालने भाऊ बबलू आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सहा सदस्यांच्या मदतीने मुलाची हत्या केली. या प्रकरणी आयपीसी कलम ३०२ (हत्या) अंतर्गत टप्पल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे, पोलिसांनी सांगितले की, विजयपाल अजूनही फरार आहे.

टॅग्स :Crime NewsArmy jawan