esakal | काश्मीरमध्ये चकमक, लष्कराच्या अधिकाऱ्यासह जवानाला वीरमरण
sakal

बोलून बातमी शोधा

Encounter Kashmirs

काश्मीरमध्ये चकमक, लष्कराच्या अधिकाऱ्यासह जवानाला वीरमरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

श्रीनगर : जम्मू -काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात गुरुवारी रात्री उशिरा दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान (JK soldier terrorist encounter) लष्कराचा एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाले. पुंछ-राजौरी जंगलात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये लढाई सुरू होती. चार दिवसांपूर्वी देखील याच भागात कारवाई करताना लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते.

हेही वाचा: आज भगवान गडावर दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण?

जम्मू-पुंछ-राजौरी महामार्ग सध्या सुरू असलेल्या कारवाईमुळे बंद करण्यात आला आहे. गेल्या १० ऑक्टोबरला सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत ही चकमक सुरू आहे. पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागात डेरा की गली (डीकेजी) मध्ये झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराचा एक अधिकारी आणि इतर चार जवान शहीद झाले होते. याआधी लष्कराने म्हटले होते की, जेसीओसह दोन सैनिक चकमकीत गंभीर जखमी झाले आहेत. सध्या पूंछ जिल्ह्यातील जंगलामध्ये गुरुवारी रात्रापासून दहशतवादी आणि लष्कराच्या जवानामध्ये चकमक सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून हे दहशतवादी लष्कराच्या टार्गेटवर होते. मात्र, जंगल आणि पहाडी परिसराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी लष्काराला चकमा दिला होता. आता गुरुवारी रात्री आमनेसामने आल्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार सुरू आहे. अलिकडच्या आठवड्यात पाकिस्तानसोबत नियंत्रण रेषेवर दहशतवादी हल्ले आणि शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये वाढ झाली आहे.

loading image
go to top