सैनिक असलेल्या पित्याने आईला घातली गोळी; मग मुलीनेच पित्याला...

वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

पत्नीवर आणि मुलीवर गोळीबार करणाऱ्या निवृत्त जवानावर प्रत्युत्तरादाखल मुलीनेच गोळी घालून ठार केल्याची घटना आज उघडकीस आली. या गोळीबारात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

मथुरा (उत्तर प्रदेश) : पत्नीवर आणि मुलीवर गोळीबार करणाऱ्या निवृत्त जवानावर प्रत्युत्तरादाखल मुलीनेच गोळी घालून ठार केल्याची घटना आज उघडकीस आली. या गोळीबारात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

छेत्राम (वय ४५) असे पित्याचे नाव असून, मिथौली गावात सोमवारी रात्री घटना घडली. त्याची पत्नी राजकुमारी (वय ३८) आणि मुलगी अलका (वय १९) हे जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिस अधिकारी शलभ माथूर यांनी सांगितले. जखमी अलकाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री वडिलांनी आईवर पिस्तूल रोखली आणि गोळी झाडली. जेव्हा अलका मध्यस्थी करू लागली तेव्हा तिच्यावरही गोळी झाडली. त्यानंतर छेत्राम याने १३ वर्षांचा मुलगा आदर्शवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अलकाने त्यांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतली आणि वडिलांवर गोळ्या झाडल्या. यात वडिलांचा मृत्यू झाला.

खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

अलका आणि राजकुमारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छेत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अलका अलाहाबादला शिकते आणि ती दोन दिवसांसाठी गावी आली होती. आदर्श हा शाळा शिकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Army veteran opens fire at family members shot dead by daughter