Video:अर्णब गोस्वामींच्या विमानातील व्हिडिओमुळं ट्विटरवर धुमाकूळ 

टीम ई-सकाळ
Tuesday, 28 January 2020

कुणाल कामराने एका ट्विटमध्ये म्हटलंय की, लखनौला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये अर्णब गोस्वामी यांची भेट झाली. त्यांच्याशी बोलण्याचा माझा प्रयत्न होता. त्यांच्या पत्रकारितेविषयी माझी काही मतं आहेत. ती त्यांना सांगायची होती.

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्विटरवर या व्हिडिओमुळं वाक् युद्ध अक्षरशः पेटलं आहे. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यानं एका फ्लाइटमध्ये अर्णब यांचा हा व्हिडिओ शूट केला आहे. त्यावरून अर्णब गोस्वामी यांच्या बाजूनं आणि विरोधात, प्रतिक्रिया उमटत आहे. या व्हिडिओमध्ये कुणाल कामराच्या एकाही प्रश्नाला अर्णब यांनी उत्तर दिलेलं नाही. दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये अर्णब गप्प बसले आहेत, याचं आश्चर्य वाटतंय, अशी प्रतिक्रिया देऊन, अर्णब गोस्वामी यांना ट्रोलही केलं जातंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे कुणाल कामराचे ट्विट
कुणाल कामराने एका ट्विटमध्ये म्हटलंय की, लखनौला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये अर्णब गोस्वामी यांची भेट झाली. त्यांच्याशी बोलण्याचा माझा प्रयत्न होता. त्यांच्या पत्रकारितेविषयी माझी काही मतं आहेत. ती त्यांना सांगायची होती. त्यांनी माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. त्यावेळी त्यांनी मला मानसिक संतुलन बिघडलेला (mentally unstable) असा उल्लेख केला, असं कुणालनं म्हटलंय. हा व्हिडिओ शूट केल्याचा मला कोणताही खेद किंवा खंत नाही. या प्रकाराबद्दल विमानातील एक व्यक्तीसोडून सर्वांचे मी आभार मानले. मी केलेलं कोणतंही कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचं आहे, असं मला वाटत नाही. 

ट्रोलिंग आणि पाठराखणही
अर्णब यांच्या या व्हिडिओवरून काहींनी अर्णब यांची पाठराखण केलीय तर, काहींनी त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. कुणाल कामरानं हा व्हिडिओ हैदराबादच्या रोहित वेमुला याला डेडिकेट करण्यात आलाय. काँग्रेस नेते शशी थरूर यांनी याप्रकारावर मार्मिक ट्विट केलंय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arnab goswami gets trolled after flight video kunal kamra twitter