कोरोनाग्रस्त रुग्ण झपाट्याने होताहेत बरे; सध्या...

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

2 लाखांहून अधिक जणांवर उपचार सुरु

- गेल्या 24 तासांत 418 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातही याचे प्रमाण मोठे आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडाही वाढत आहे. देशात आत्तापर्यंत 3,34,822 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोना व्हायरसने देशभरात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारकडूनही विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतर आता यावर उपाययोजनाही सुरु आहेत. त्यानंतर आता या संदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशभरात 3,34,822 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर 29 जूनपर्यंत देशभरात एकूण 86,08,654 नमुने तपासणी करण्यात आली आहे. यातील 2,10,292 नमुने काल (सोमवार) तपासले गेले आहेत.

गेल्या 24 तासांत 418 रुग्णांचा मृत्यू

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत 418 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 18,522 नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. याशिवाय सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा 5,66,840 वर गेला आहे. 

2 लाखांहून अधिक जणांवर उपचार सुरु

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यानुसार त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा कार्यरत आहे. त्यामध्ये आता रुग्णसंख्या 5,66,840 वर पोहोचली आहे. तर सध्या 2,15,125 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Around 334822 COVID 19 Patients cured in India