PM मोदींच्या सुरक्षेत त्रुटी : 'पोलिसांना रोखणारा काँग्रेस नेता कोण?'

PM Modi Pune Visit
PM Modi Pune Visitsakal
Summary

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी, त्या घटनाक्रमाबाबत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना सविस्तर माहिती दिली असे म्हटले आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेपासून काही अंतरावर तब्बल २० मिनिटे अडकून राहावे लागले याचे खापर भाजपने पुन्हा राज्य सरकारवर फोडले आहे. एका खासगी वाहिनीने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशनचा हवाला देऊन भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, ‘‘पंजाब (Punjab) पोलिसांच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचा ताफा अडकला असून हे धोकादायक, निंदनीय व दंडनीयही असल्याचा संदेश अनेकदा पाठवूनही त्याबाबत काहीही निर्णय न घेणारे पंजाब पोलिसांचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी व त्यांना काही कृती न करण्याचे आदेश देणारे सत्तारूढ काँग्रेस नेते कोण आहेत हे देशाच्या जनतेला स्पष्टपणे कळले पाहिजे.’’

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी, त्या घटनाक्रमाबाबत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना सविस्तर माहिती दिली असे म्हटले आहे. त्यावर इराणी यांनी तीव्र आक्षेप घेतला. वारंवार माहिती मिळूनही काँग्रेस सरकारने हेतुतः पंतप्रधानांना असुरक्षित वातावरणात अडकविले, हे निंदनीय व दंडनीय दोन्हीही आहे, असे इराणी यांनी म्हटले आहे.

PM Modi Pune Visit
पंजाबला खंबीर आणि निर्णयक्षम मुख्यमंत्र्याची आवश्यकता ; तिवारी

प्रियांका यांना भलताच रस का
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत वरिष्ठ सुरक्षा यंत्रणेलाच जी माहिती असते तो डेटा प्रियांका गांधी यांना पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात दिला. प्रियांका या सामान्य नागरिक आहेत. एका सामान्य नागरिकाला इतकी टोकाची संवेदनशील माहिती पुरविणे योग्य आहे का, त्यातही प्रियांका याबाबत इतक्या उत्सुक का आहेत, पंतप्रधानांच्या जिवाला धोका निर्माण होतो त्या प्रकरणात त्यांना इतका रस का आहे, या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत, असे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com