'हिंदू पाकिस्तान' म्हणणाऱ्या थरूर यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

'भाजपने 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यास ते 'हिंदू पाकिस्तान'सारखी स्थिती निर्माण करतील,' असे विधान थरूर यांनी गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये केले होते.

कोलकता - काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याविरुद्ध बंकशल न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले.

थरूर यांनी गेल्या वर्षी केलेल्या 'हिंदू पाकिस्तान' या विधानाबद्दल हे वॉरंट काढण्यात आले आहे. ऍड. सुमीत चौधुरी यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या आधारे महानगर दंडाधिकाऱ्यांनी हे वॉरंट जारी केले. अनेकदा समन्स पाठवूनही थरूर न्यायालयापुढे हजर न झाल्यामुळे हे वॉरंट काढण्यात आल्याचे कळते; मात्र त्याला दुजोरा मिळाला नाही.

'भाजपने 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकल्यास ते 'हिंदू पाकिस्तान'सारखी स्थिती निर्माण करतील,' असे विधान थरूर यांनी गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये केले होते. तिरुअनंतपुरमधील सभेत बोलताना, भाजप घटनेत बदल करेल आणि तेथे अल्पसंख्यकांना किंमत नसेल, असेही ते म्हणाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arrest warrant has been issued against Shashi Tharoor