शिक्षण 'स्वरूपी' सौदामिनी

Swarup-Sampat
Swarup-Sampat

एकेकाळी ग्लॅमरच्या जगात रमलेल्या अभिनेत्री, मॉडेल स्वरूप संपत यांनी आता अतिशय वेगळी वाट शोधली आहे. त्या ‘एज्युकेटर’ बनल्या आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रात त्यांनी इतकी कमाल केली, की राष्ट्रीय नव्हे; तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या पोचल्या. अर्थात, त्यांचं हे विद्यादान पारंपरिक शिक्षण क्षेत्रातलं नाही. स्वरूप संपत यांनी ‘लाइफ स्किल्स’ शिक्षणात स्वतःला झोकून दिलंय.

तुम्ही त्यांना ‘ऑल द बेस्ट’, ‘ये जो है जिंदगी’सारख्या मालिकांत विनोदी भूमिकांत पाहिलंय. एकेकाळी ‘मिस इंडिया’ किताबही त्यांनी मिळवलाय; पण आज ती त्यांची तेवढीच ओळख नाही. त्यांना एका विशिष्ट टप्प्यावर स्वतःची वेगळी वाट सापडली आणि त्यांनी त्यात इतकी कमाल केली, की राष्ट्रीय नव्हे; तर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या पोचल्या. येस, ही कहाणी आहे अभिनेत्री स्वरूप संपत यांची. खरंतर अभिनेत्री नव्हे, तर ‘एज्युकेटर’ स्वरूप संपत यांची.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्लॅमरचा मुखवटा बाजूला ठेवून विद्यादानाचा वसा घेतलेली ही सौदामिनी आहे. अर्थात, त्यांचं हे विद्यादान पारंपरिक शिक्षण क्षेत्रातलं नाही. स्वरूप संपत यांनी ‘लाइफ स्किल्स’ शिक्षणात स्वतःला झोकून दिलंय. मूल्य शिक्षण, कौशल्य शिक्षण आणि कला शिक्षण या सगळ्यांचं एकत्रीकरण असलेलं हे वेगळ्याच प्रकारचं अध्यापन. विद्यादानाचं इतकं काम स्वरूप संपत यांनी करून ठेवलं, की वर्की फाउंडेशननं ‘ग्लोबल टीचर प्राइझ’ स्पर्धेसाठी निवडलेल्या अंतिम दहा व्यक्तींपैकी त्या एक होत्या. तब्बल १७९ देशांतल्या दहा हजार शिक्षकांतून स्वरूप संपत यांना हा मान मिळाला. ही शिक्षण‘स्वरूपी’ सौदामिनी अनेकांना दिशा देणारी आहे, यात वादच नाही. 

स्वरूप संपत यांची कहाणी खरंतर अनेक अर्थांनी प्रेरणादायी. मुलं झाल्यानंतर ‘होम मेकर’ म्हणून काम करताना आणि मुलांच्या शिक्षणाची प्रक्रियाही आनंदानं अनुभवताना त्यांच्याकडे एक संधी आली. शारीरिकदृष्ट्या अक्षम असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी एक अभ्यासक्रम आयोजित करण्यात आला होता. संपत त्यांच्या मुलांच्या शाळेत पालकसभेच्या प्रतिनिधी असल्यानं त्यांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी पुढाकार घेऊन त्यात भाग घेतला आणि त्यांना त्यात खूप आनंद मिळाला. मग त्या हळूहळू मुलांच्या शाळेत अधूनमधून तास घेऊ लागल्या. नाटकाचा अध्यापनात उपयोग करायला लागल्या. हळूहळू हे काम वाढत गेलं आणि संपत यांनी ‘युनिव्हर्सिटी ऑफ वोर्सेस्टर’मध्ये एका अभ्यासक्रमासाठी अर्ज केला. त्यांनी त्यांना थेट पीएचडीसाठीच विचारणा केली. संपत मग ‘डॉक्टर’ झाल्या आणि त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही.

आता त्या अनेक ठिकाणी दौरे करतात, कार्यशाळा घेतात आणि अध्यापनाची प्रक्रिया कशी सोपी करता येईल, याचे धडे शिक्षकांना देतात. अभिनय ही त्यांची एकेकाळची पॅशन होती. त्याचा धागा अध्यापनात कसा आणता येईल, याचा त्यांनी विचार केला आणि तेच त्यांच्या अध्यापनाचं वैशिष्ट्य ठरलं. हे अध्यापन सेवा म्हणून देण्याचा सल्ला पती परेश रावल यांनी दिला. तो मानून ही ‘स्वरूप’सुंदरी ‘शिक्षणव्रती’ म्हणून काम करत आहे.

लहान मुलांचं आयुष्य उत्तम करण्यासाठी शिक्षण हा मी निवडलेला मार्ग आहे. मुलांना चांगल्या पद्धतीनं शिकता यावं, यासाठी मी स्वतःही शिक्षणाचे नवीन मार्ग शोधत असते. नावीन्यपूर्ण आणि सुधारित पद्धती, परिणामकारक अभ्यासक्रम, गुणात्मक संशोधन यांतून खूप काही साध्य होऊ शकतं.
- स्वरूप संपत

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com