
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी ‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता सर्जनशीलतेची जागा घेऊ शकणार नाही, हे आत्ताच्या घडीला निश्चितपणे सांगता येईल. मात्र याची भविष्यातील दिशा अद्याप स्पष्ट नाही. सर्व तंत्रज्ञानाप्रमाणेच कृत्रिम बुद्धिमत्ता हीदेखील मानवाच्या मदतीसाठीच आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा आवाका व्यवस्थितपणे समजून घेत त्याचा वापर व्हावा’’, असा सूर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता’या परिसंवादात उमटला.