अरुण जेटलींची प्रकृती खालावली; एम्समध्ये भरती

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री राहिलेले अरुण जेटली यांची प्रकृतीत खालावली आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थमंत्री राहिलेले अरुण जेटली यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी यंदाच्या मंत्रीमंडळात मंत्रीपद घेण्यास नकार दिला होता. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Jaitley admitted to AIIMS for medical check up