अरुणा वाघ यांची बदली पुन्हा गोव्यात

तेजश्री कुंभार
गुरुवार, 17 मे 2018

दै. गोमन्तकने सतत दोन दिवस केलेल्या बातम्यांमुळे अरुणा यांची बदली पुन्हा गोव्यात करण्यात आली आहे. विष्णू वाघ यांचे निकटचे मित्र देविदास आमोणकर यांनी दै. गोमन्तकचे दूरध्वनीच्या माध्यमातून वाघ कुटुंबीयांतर्फे आभार व्यक्‍त केले तर विष्णू वाघांच्या समर्थकांनीही विविध माध्यमातून दै. गोमन्तकचे आभार मानले. 

पणजी : प्रसिद्ध साहित्यिक आणि माजी आमदार विष्णू सूर्या वाघ यांच्या आजारपणात त्यांची पत्नी अरुणा वाघ यांची बदली केंद्र सरकारतर्फे सर्व्हिस रूल्स अँड ट्रान्स्फर पॉलीसीविरूध्द मुंबई येथे केली होती.

दै. गोमन्तकने सतत दोन दिवस केलेल्या बातम्यांमुळे अरुणा यांची बदली पुन्हा गोव्यात करण्यात आली आहे. विष्णू वाघ यांचे निकटचे मित्र देविदास आमोणकर यांनी दै. गोमन्तकचे दूरध्वनीच्या माध्यमातून वाघ कुटुंबीयांतर्फे आभार व्यक्‍त केले तर विष्णू वाघांच्या समर्थकांनीही विविध माध्यमातून दै. गोमन्तकचे आभार मानले. 

गेल्या अनेक दिवसांपासून वाघ कुटुंबीयांनी बदली थांबविण्यासाठी विविध प्रयत्न केले होते. मात्र दै. गोमन्तकने दिलेल्या अवघ्या दोन दिवसांच्या सविस्तर वृत्तांकणामुळे वाघ कुटुंबीयांची अडचण सर्वांच्याच लक्षात आली, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मिडीआच्या माध्यमातून गोमन्तकच्या बातम्या शेअर करून लोकांनी आपली मते मोठ्या प्रमाणात नोंदविली, परिणामतः अरुणा यांची बदली पुन्हा गोव्यात करण्यात आली आहे. 

Web Title: Arun Wagh transfer in Goa