Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता स्थापन; पेमा खांडू तिसऱ्यांदा मुख्यमंत्री

भाजपचे नेते पेमा खांडू यांनी सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. पेमा खांडू यांची काल नेतेपदी निवड करण्यात आली होती.
Chief Minister Pema Khandu
Chief Minister Pema Khandusakal

इटानगर - भाजपचे नेते पेमा खांडू यांनी सलग तिसऱ्यांदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली. पेमा खांडू यांची काल नेतेपदी निवड करण्यात आली होती. तवांग जिल्ह्यातील मुक्तो विधानसभा मतदारसंघातून खांडू यांची बिनविरोध निवड झाली होती.

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल के.टी. पारनाईक यांनी खांडू यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. डोरजे खंडू स्टेट कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित शपथविधी सोहळ्यात अकरा अन्य आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात उपमुख्यमंत्री चौना मीन, माजी विधानसभा अध्यक्ष पी.डी. सोना, भाजप प्रदेशाध्यक्ष बियुराम वाहगे, माजी मुख्यमंत्री कलिखो पुल यांची पत्नी दासंगलू पुल यांचा समावेश आहे.

यावेळी गृहमंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. दासंगलू पूल या एकमेव महिला मंत्री असून नव्या मंत्रिमंडळात आठ नवीन चेहरे आहेत.

भाजपचे नेते पेमा खांडू यांची काल एका बैठकीत विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यावेळी भाजपचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुघ यांची प्रमुख उपस्थित होते. भाजपने ६० सदस्यीय विधानसभेत ४६ जागा जिंकल्या. २०१९ च्या तुलनेत पाच जागा अधिक आहेत. यापैकी दहा जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात पेमा खांडू यांच्या मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

निष्णात राजकारणी पेमा खांडू

राज्याचे माजी मुख्यमंत्री डोरजी खांडू यांचे पुत्र आणि मोनपा समुदायाचे नेते पेमा खांडू (वय ४४) हे पहिल्यांदा २०१६ मध्ये मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी अनेक आमदारांना सोबत घेत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ‘पीपीए’ला साथ दिली. त्यानंतर भाजपमध्ये सामील झाले. क्रीडा आणि संगीताचे हौशी असणारे पेमा खांडू हे अरुणाचल प्रदेशातील बडे नेते म्हणून ओळखले जातात. खांडू यांनी निवडणूक रणनितीकार म्हणून प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्याच रणनितीनुसार पक्षाने निवडणूक हाताळल्याने राज्यात तिसऱ्यांदा कमळ फुलले आहे.

तीन मंत्र्यांना स्थान नाही

पेमा खांडू यांच्या नव्या टीममध्ये मागच्या मंत्रिमंडळातील तिघांना स्थान मिळाले नाही. होचुन नगडाम, अलो लिबांग आणि नाकाप नालो यांना स्थान मिळाले नाही. त्यांच्याकडे अनुक्रमे ग्रामीण कार्य, आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि पर्यटन अशी खाती होती. त्याचवेळी शिक्षण मंत्री ताबा तेडिर हे याचुली मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार टोको तातुंग यांच्याकडून पराभूत झाले.

तसेच मागच्या काळातील गृहमंत्री बामांग फेलिक्स, उद्योग मंत्री तुमके बागरा आणि पशु संवर्धन मंत्री तागे टाकी यांना पक्षाने तिकीट नाकारले. राजकीय विश्‍लेषकांच्या मते, मागच्या कारकिर्दीत त्यांची कामगिरी खराब राहिल्याने त्या तिघांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही.

अरुणाचल प्रदेश मंत्रिमंडळ

  • मुख्यमंत्री - पेमा खांडू

  • उपमुख्यमंत्री - चौना मीन

  • केन्टो जिनी

  • बालो राजा

  • मामा नातुंग

  • दासंगलू पुल

  • पासंग डोरजे सोना

  • गाब्रिएल देवांग वांग्झू

  • वांग्की डुकाम

  • बियूराम वाहगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com