esakal | Delhi Elections : ज्यांनी काम केलं त्यांनाच दिल्लीकर निवडून देतील : अरविंद केजरीवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejarval and Manish Sisodia casts vote for Delhi assembly elections

यावर्षी अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित हा पहिल्यांदाच मतदान करत आहे. त्याने दिल्लीतील तरूणाईला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यासह त्यांची पत्नी, मुलगी, आई-वडिल यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 

Delhi Elections : ज्यांनी काम केलं त्यांनाच दिल्लीकर निवडून देतील : अरविंद केजरीवाल

sakal_logo
By
वृत्तसंस्था

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली : बहुचर्चित अशा दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी आज (ता. ८) मतदान होत आहे. सकाळीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. सिव्हिल लाईन्स येथे त्यांचे मतदान केंद्र होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महिलांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन केले आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत दिल्लीत ६.९६%मतदान झाले. 

Delhi Assembly Elections : दिल्लीकर आज कोणाला देणार कौल!

'मला आशा आहे की, दिल्लीतील जनता ही काम पाहूनच मतदान करेल. विशेषतः महिलांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे मी आवाहन करतो. माझी अशी अपेक्षा आहे की आप तिसऱ्यांदा पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल,' अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी माध्यमांशी बालताना दिली. आपने मागील निवडणूकीत ६७ जागा जिंकल्या होत्या, दिल्लीकरांनी मुख्यमंत्री म्हणून त्यांनाच पसंती दर्शवली होती. 

यावर्षी अरविंद केजरीवाल यांचा मुलगा पुलकित हा पहिल्यांदाच मतदान करत आहे. त्याने दिल्लीतील तरूणाईला जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यासह त्यांची पत्नी, मुलगी, आई-वडिल यांनीही मतदानाचा हक्क बजावला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही पांडव नगर येथे पत्नी सीमा सिसोदिया यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते पतपरगंज विधीनसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणता उतरले आहे.

दोन दिवसांपूर्वीच त्यांचे विशेष अधिकारी गोपाल कृष्ण माधव यांना लाच घेतल्याप्रकरणी अटक केले होते.