esakal | Delhi Assembly Elections : दिल्लीकर आज कोणाला देणार कौल!
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi-Vidhansabha Election

मुस्लिमांची मते कोणाला?
सीएए कायद्याच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीतील मुस्लिम मतदाराचा कौल कोणाकडे राहणार, याबाबत उत्सुकता आहे. दिल्लीच्या सुमारे दोन कोटी लोकसंख्येपैकी १६ ते १८ टक्के मुस्लिम समाजाची लोकसंख्या आहे व त्यातील मतदार १२ टक्के आहेत. हा समाज पारंपरिकदृष्ट्या काँग्रेसचा व आता ‘आप’कडे वळलेला मतदार मानला जातो. किमान ९ ते १० मतदारसंघांत मुस्लिम मतटक्का २० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. यात सीलमपूर (५० टक्के) मटिया महल (४८), ओखला (४३), बल्लीमारन (३८), मुस्तफाबाद (३६), बाबरपूर (३५) हे मतदारसंघ आहेत.

Delhi Assembly Elections : दिल्लीकर आज कोणाला देणार कौल!

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 : नवी दिल्ली - भारताचे ‘दिल’ असलेल्या व आसेतूहिमाचल चर्चेचा विषय बनलेल्या दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज (ता. ८) मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दारूबंदीसह सारे उपाय केले असून, सुरुळीत मतदानासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सत्तारूढ आम आदमी पक्षाने विकासकामांवर पुन्हा दिल्लीकरांचा कौल मागितला आहे. ध्रुवीकरणाचे कार्ड खेळतानाच भाजपने दिल्लीत केंद्र व १५ राज्यांतील महाप्रचंड सत्ताशक्तीला मैदानात उतरवून सत्ता हस्तगत करण्यासाठी सारी ताकद पणाला लावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह अनेक नेत्यांनी मंदिरांमध्ये जाऊन आपल्या विजयाचे साकडे घातले. केजरीवाल यांनी कॅनॉट प्लेसमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरात जाऊन शक्तिदात्याची प्रार्थना केली, तर तिवारी यांनी छत्तरपूरच्या कात्यायनी देवी मंदिरात जाऊन पूजापाठ केली. केजरीवाल यांनी ट्‌विट केले, की ‘‘आज मी प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला व दिल्लीच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली.

Coronavirus : कोरोनामुळे मिरची उत्पादक हैराण!

हनुमानाने मला सांगितले की चांगले काम करत आहेस. याच पद्धतीने लोकांची सेवा करत रहा. फळ देणे माझ्यावर सोड. सारे काही चांगले होईल.’’

पंतप्रधान मोदींनी राममंदिराबाबत ट्रस्ट स्थापण्याच्या घोषणेसाठी दिल्लीचा प्रचार थांबण्याचा मुहूर्त निवडला. भाजपने तर मुख्यमंत्रिसारख्या घटनात्मक पदावरील केजरीवाल यांना अतिरेकीच ठरविले व त्याची दिल्लीकरांत तीव्र प्रतिक्रिया आहे. केजरीवाल यांनी भाजपच्या विखारी टीकेला, भर सभेत हनुमान चालिसा म्हणून प्रत्युत्तर दिले. केजरीवाल यांनी शासन म्हणून अत्यंत अल्प शक्ती हाती असूनही गेले किमान चार महिने मोफत वीज, मोफत पाणी व महिलांना मोफत बस प्रवासा यासारख्या ‘इलेक्‍शन गिफ्ट’चा वर्षाव केला आहे. भाजपने भारत- पाकिस्तान व ध्रुवीकरणाकडे प्रचाराची गाडी वळविण्याचे प्रयत्न केले. मंत्री अनुराग टाकूर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ऊर्फ अजयसिंह बिश्‍त, खासदार प्रवेश वर्मा यांनी अत्यंत भडक भाषणे केली. यातील वर्मा व ठाकूर यांच्यावर प्रचारबंदी लादण्याची कारवाई निवडणूक आयोगाने केली. भाजप अखेरच्या दोन दिवसांतही बूथनिहाय व प्रत्येक मतदाराला गाठून प्रचार करत आहे.  

राम मंदिर ट्रस्टमधील एकमेव दलित सदस्य आहेत तरी कोण?  

निवडणूक आयोग सज्ज
उद्या सकाळी ८ ते संद्याकाळी पाच या वेळेत होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. तब्बल ४० हजार दिल्ली पोलिस, अर्धसैनिक दलाच्या १९० कंपन्या व १९ हजार होमगार्डस बंदोबस्तासाठी सज्ज असतील. दिल्लीतील ५४५ मतदानकेंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. 

शाहीन बागेतील निदर्शनांना विराम
सीएए कायद्याला विरोध करण्यासाठी गेले दीड महिना शाहीन बागेच्या रस्त्यावर भर थंडीतही तळ ठोकून बसलेल्या हजारो महिलांची शांततापूर्ण निदर्शने हा संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला. उद्या मतदान असल्याने मतदारांच्या सुविधेसाठी या आंदोलनकर्त्यांनी आंदोलन एका दिवसासाठी स्थगित केले आहे. उद्या (ता. ८) रात्री आठ पासून पुन्हा निदर्शने सुरू होतील, असे सांगण्यात आले.