
Delhi Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या एक दिवस आधी राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपकडून फोन आल्याबद्दल आणि १५ कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याबद्दल आप नेत्यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांच्या आदेशानंतर, एसीबीची पथके आप नेते अरविंद केजरीवाल, संजय सिंह आणि मुकेश अहलावत यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीचे पथक आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहे.