'डीडीसीए'प्रकरणी केजरीवालांना दिल्ली न्यायालयाचा झटका

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) आणि चेतन चौहान यांच्या फौजदारी मानहानी प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 31 मार्च रोजी हजर राहण्याचे आदेश दिले. केजरीवाल यांना वैद्यकीय कारणास्तव सवलत देण्यात येईल, असेही न्यायालयाने या वेळी सांगितले.

दरम्यान, याच प्रकरणासंबंधी भाजपचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यांना दहा हजारांच्या जातमुचलक्‍यावर जामीन मंजूर करण्यात आला. दिल्ली न्यायालयाचे न्या. अभिषेक मल्होत्रा यांनी या प्रकरणी केजरीवालांविरोधात समन्स जारी करण्याचे आदेश दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arvind kejriwal and ddca