
नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणूक जिंकून दिल्लीत आम आदमी पक्ष सत्तेत आल्यास मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये दरमहा २१०० रुपये जमा होतील, अशी घोषणा आज सत्ताधारी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली. दरम्यान, दिल्लीतील महिलांना दरमहा एक हजार रुपये साह्य देण्याच्या योजनेसाठी शुक्रवारपासून नोंदणी सुरु करण्यात येणार आहे.