गुजरातमध्ये माघार घ्या जैन, सिसोदियांना सोडतो; भाजपने ऑफर दिल्याचा केजरीवालांचा गैप्यस्फोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Elections 2022

गुजरातमध्ये माघार घ्या जैन, सिसोदियांना सोडतो; भाजपने ऑफर दिल्याचा केजरीवालांचा गैप्यस्फोट

Gujarat Assembly Elections 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी गैप्यस्फोट केला आहे. त्यांनी सांगितल की भाजपने मला गुजरात निवडणूक न लढवण्याची ऑफर दिली आहे. मला सांगण्यात आलं होत की गुजरात निवडणूक लढवू नका. सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना चौकशीच्या फेऱ्यातून त्यांना बाहेर काढतो.

हेही वाचा: Dilip Walse Patil : माजी गृहमंत्र्यांनी पुन्हा एकदा पार पडली शरद पवारांच्या PA ची भूमिका

सीएम केजरीवाल म्हणाले की, मनीष सिसोदिया यांच्या चौकशीदरम्यान सीबीआयने त्यांना सांगितल की केजरीवालांची साथ सोडा आणि भाजपमध्ये या तुम्हाला मुख्यमंत्री बनवू. एनडीटीव्हीशी बोलताना केजरीवाल म्हणाले, "मनीष सिसोदिया यांनी 'आप' सोडण्याची आणि दिल्लीचे मुख्यमंत्री होण्याची भाजपची ऑफर नाकारली.

ही ऑफर येताच त्यांनी याची मला कल्पना दिली. आणि जर तुम्ही गुजरातची निवडणूक लढवली नाही. तर आम्ही सत्येंद्र जैन आणि सिसोदिया या दोघांना त्यांच्यावरील सर्व आरोपातून बाहेर काढू, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Sharad Pawar: आजारपणामुळे फक्त चार मिनिटं बोलले पवार; वळसे पाटलांनी वाचलं भाषण

हेही वाचा: अजित पवार नाराज? राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला दुसऱ्या दिवशी गैरहजर

हा प्रस्ताव कोणी दिला असे विचारले असता केजरीवाल म्हणाले, भाजपवाले कधीही थेट संपर्क साधत नाहीत. ते मित्र पक्षा मार्फत प्रस्ताव पोहचवतात. भाजप गुजरात निवडणुका आणि दिल्लीतील महापालिका निवडणुकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी आपचा पराभव करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न सुरू केले आहेत.

याशिवाय दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर केजरीवाल म्हणाले की, "होय राज्यात प्रदूषण वाढले आहे, हे मी मान्य करतो. पण त्यात थोडी सुधारणाही झाली आहे", गुजरात निवडणुकीवर बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले की, "आता गुजरातमधील लोकांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या गलथान कारभारावर जनता नाराज आहे, 27 वर्षात भाजपने महागाई दिली आहे. अशा परिस्थितीत यावेळी गुजरातची जनता महागाईसारख्या मुद्द्यांवर 'आप'ला मत देईल"