Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची गांधीगिरी ! न्या. स्वर्णकांता यांच्या न्यायालयात उपस्थित राहणार नाहीत; 'या'मुळे अवलंबला सत्याग्रहाचा मार्ग

Kejriwal court boycott : केजरीवाल यांनी जाहीर केले की ते या न्यायालयात प्रत्यक्ष किंवा वकिलामार्फत हजर राहणार नाहीत. त्यांनी न्यायमूर्तींवर पूर्वग्रहदूषित असल्याचा आरोप करत सत्याग्रहाचा मार्ग स्वीकारण्याची घोषणा केली.
Arvind Kejriwal announces his decision to boycott court proceedings in the Delhi liquor policy case, citing concerns over judicial bias.

Arvind Kejriwal announces his decision to boycott court proceedings in the Delhi liquor policy case, citing concerns over judicial bias.

esakal

Updated on

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची, कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. या निकालाला आव्हान देत तपास यंत्रणेने दिल्ली उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. मात्र, आपण न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या न्यायालयात हजर राहणार नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी आता जाहीर केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com