arvind kejriwal Singapore News : केजरीवालांना धक्का! सिंगापूरला जाऊ शकणार नाही; एलजीने नाकारली परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arvind kejriwal Latest Singapore News

केजरीवालांना धक्का! सिंगापूरला जाऊ शकणार नाही; एलजीने नाकारली परवानगी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सिंगापूरला जाऊ शकणार नाही. लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी त्यांच्या दौऱ्याला परवानगी नाकारली आहे. अरविंद केजरीवाल यांना १ ऑगस्ट रोजी एका परिषदेत सहभागी होण्यासाठी सिंगापूरला (Singapore) जायचे होते. दिल्ली सरकारने यासाठी एलजीकडे परवानगी मागितली होती. (arvind kejriwal Latest Singapore News)

एलजी कार्यालयाच्या वतीने फाईल फेटाळताना ही महापौरांची बैठक असल्याचे सांगण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्याचवेळी आम आदमी पक्षही प्रवासाला परवानगी देण्याची मागणी सातत्याने करीत होता. मुख्यमंत्री केजरीवाल शिक्षण आणि आरोग्याबाबत दिल्लीत केलेल्या कामांची माहिती देतील, त्यामुळे देशाची मान वाढेल, असा पक्षाचा युक्तिवाद होता.

हेही वाचा: Gyanvapi Controversy : दोन याचिकेवर सुनावणी करण्यास SC ने दिला नकार

एलजीने दिलेल्या कारणाशी सहमत नाही. मुख्यमंत्र्यांना हे वैयक्तिक निमंत्रण आहे. सिंगापूरला जाण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल थेट परराष्ट्र मंत्रालयाकडे अर्ज करणार आहे. ही चुकीच्या परंपरेची नांदी आहे, असे एलजीने फाईल नाकारल्याबद्दल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) म्हणाले.

‘सिंगापूर (Singapore) सरकारने जागतिक दर्जाच्या परिषदेत दिल्ली मॉडेल सादर करण्यासाठी आमंत्रित केले आहे. दिल्लीचे मॉडेल जगभरातील अनेक मोठ्या नेत्यांसमोर मांडले जाणार आहे. आज जगाला दिल्ली मॉडेलबद्दल जाणून घ्यायचे आहे. हे निमंत्रण देशासाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी लिहिले होते.

Web Title: Arvind Kejriwal Delhi Singapore Permission Denied

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..