Delhi Election : 'आप'च्या विधिमंडळ नेतेपदी झाली 'या' नेत्याची निवड

वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

आम आदमी पक्षाच्या ६२ आमदारांनी अरविंद केजरीवालांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड केली आहे, येत्या सोळा तारखेला रामलीला मैदानावर केजरीवालांना आशीर्वाद देण्यासाठी दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने यावे असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या ६२ आमदारांनी अरविंद केजरीवालांची विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड केली आहे, येत्या सोळा तारखेला रामलीला मैदानावर केजरीवालांना आशीर्वाद देण्यासाठी दिल्लीकरांनी मोठ्या संख्येने यावे असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात भाजपला चारीमुंड्या चीत करत ७० पैकी ६२ जागांवर विजयी पताका फडकावणारे आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे येत्या रविवारी (ता.१६) ऐतिहासिक रामलीला मैदानावर सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

काँग्रेसला धक्का; 'या' ज्येष्ठ नेत्याची एनआयएकडून चौकशी

रविवारी सकाळी दहा वाजता शपथविधी कार्यक्रम सुरू होईल. केजरीवाल यांच्यासह सारे मंत्रीही शपथ घेतील. फक्त कामाच्या आधारावर कोणत्याही राज्यात एखाद्या पक्षाला सलगपणे मिळालेला हा पहिला विजय आहे. दिल्लीतील पराभवानंतर भाजपमध्ये आता अंतर्गत मंथन सुरू झाले असून प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आज सायंकाळी नवनिर्वाचित आठ भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा उद्या (ता. १३) पक्षाच्या साऱ्या राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक घेणार आहेत. त्यातही दिल्लीतील भाजपच्या कामगिरीबाबत मंथन अटळ असल्याचे स्पष्ट आहे.

कामाच्या बळावर विजय
सिसोदिया यांनी सांगितले की, दिल्लीकरांनी आपला सलग दुसऱ्यांदा इतका बंपर विजय देऊन "द्वेषाच्या नव्हे, तर कामाच्या' निकषावर मतदान केले. राजकारणाचे विकास मॉडेल हे केजरीवाल मॉडेलच असू शकते हे दिल्लीने पुन्हा सिद्ध केले. आपल्या देशावर प्रेम करण्याचा, राष्ट्रभक्तीचा अर्थ जनतेला चांगले शिक्षण, आरोग्यसेवा, वीज व पाणी, महिलांना सुरक्षा हा असल्याचे दिल्लीकरांनी दाखवून दिले. केजरीवाल आमचा मुलगा-भाऊ आहे हेही दिल्लीकरांनी द्वेष व विष पसरविणाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले. आपच्या नवनिर्वाचित आमदारावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे दिल्लीच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल पुन्हा गंभीर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arvind Kejriwal elected as leader of AAP legislative party