काँग्रेसच्या 'या' ज्येष्ठ नेत्याची एनआयएकडून चौकशी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

  • कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सरुरी यांची एनआयएकडून चौकशी

जम्मू : किश्‍तवाड जिल्ह्यातील दहशतवादी हल्ला आणि दहशतवाद्याच्या संबंधांवरून जम्मू कश्‍मीरमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जी. एम. सरुरी यांची मंगळवारी एनआयएकडून चौकशी करण्यात आली. यादरम्यान सरुरी यांनी माध्यमांशी बोलताना लपवण्यासारखे काहीही नसल्याचे म्हटले आहे. मला कोणाच्याही प्रशस्तिपत्राची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काल सकाळी सरुरी एनआयएच्या कार्यालयात पोचले आणि सायंकाळी सातपर्यंत चौकशी सुरू होती. त्यांना अनेक प्रश्‍न विचारण्यात आले. सरुरी यांचे वक्तव्य आणि किश्‍तवाड जिल्ह्यातील दहशतवादी हल्ले याचा काही संबंध आहे काय, याचा तपास एनआयएकडून केला जात आहे. तत्पूर्वी सरुरी म्हणाले की, एनआयएचे समन्स माझ्या आकलनाबाहेरचे आहे. माझा संबंध हिज्बुल मुजाहिदीन किंवा दहशतवादी ओसामा बिन लादेनशी वाटतो काय? त्यांनी चौकशीत हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी मोहंमद अमीन भट याच्याशी संबंध असल्याचा इन्कार केला.

खूशखबर ! या कंपनीत आहे २० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती

जहाँगीर सरुरीने किश्‍तवाड जिल्ह्यात २०१८ नोव्हेंबरपासून चौघांची हत्या केली आहे. विशेष म्हणजे किश्‍तवाड दहशतवादमुक्त जिल्हा म्हणून जाहीर केलेला असताना जहाँगीर सरुरी याने घातपाती कारवाया घडवून आणल्या. ते म्हणाले, माझा किंवा माझ्या कुटुंबाचा जहाँगीर सरुरीशी कोणताही संबंध नाही. ६७ वर्षीय सरुरी यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. आपण जहाँगीर सरुरीला कधीही पाहिले नसल्याचा दावा त्यांनी केला. आजही सरुरी एनआयए कार्यालयात गेले होते. सरुरी यांच्या मुलाने एनआयएच्या चौकशीत वडिलांनी सहकार्य केल्याचे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Former J&K Minister GM Saroori Responds To NIA Summons