
दिल्लीच्या CM ने उडवली देशाच्या PM ची खिल्ली; म्हणाले...
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी शनिवारी (ता. ३०) गुजरातमधील भाजप नेत्यांची बैठक पार पडली. भाजप गुजरात विधानसभा विसर्जित करून पुढील आठवड्यात निवडणुका जाहीर करणार आहे का, असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी करून खिल्ली उडवली आहे. (Kejriwal said, Will BJP announce elections?)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, कायदा मंत्री राजेंद्र त्रिवेदी आणि गुजरातचे मुख्य सचिव होते. भाजप पुढील आठवड्यात गुजरात विधानसभा विसर्जित करून गुजरात निवडणुकीची घोषणा करणार आहे का? ‘आप’ची इतकी भीती?, असे ट्विट केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केले.
हेही वाचा: असदुद्दीन ओवैसी म्हणाले, राज ठाकरे यांनी भाजपमध्ये कधी जाणार हे सांगावे
गुजरातमध्ये (gujarat) यावर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. दिल्ली आणि नंतर पंजाबमध्ये सत्तेपर्यंत पोहोचलेला आम आदमी पक्ष पूर्ण ताकदीनिशी गुजरातच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. पंजाबनंतर आता गुजरातची पाळी आहे, असा संदेश देण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाने केला आहे. काँग्रेसला पर्याय म्हणून पक्षाची वाटचाल सुरू आहे.
आता गुजरातची वेळ
एप्रिलच्या सुरुवातीला अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत गुजरातमध्ये रोड शो केला. यादरम्यान केजरीवाल यांनी राज्यातील अनेक नेत्यांची भेट घेतल्याचेही वृत्त आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या रोड शोमध्ये केजरीवाल म्हणाले होते की, मित्रांनो, मला राजकारण कसं करायचं ते कळत नाही, भ्रष्टाचार कसा संपवायचा हे मला माहीत आहे. दिल्लीतील भ्रष्टाचार आम्ही संपवला आहे. भगवंत मान यांनी पंजाबमधील भ्रष्टाचार संपवला आणि आता गुजरातची (gujarat) वेळ आहे.
Web Title: Arvind Kejriwal Narendra Modi Will Bjp Announce Elections
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..