
'मी शाळा सुधारल्या नाहीत तर…'; केजरीवालांचे गुजरातच्या जनतेला आवाहन
नवी दिल्ली : गुजरात विधानसभेच्या निवडणूक मैदानात आम आदमी पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात आहे. पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गुजरातमध्ये नवीन बदलाची घोषणा करत आम्ही सादर केलेले शासनाचे मॉडेल पंजाबमध्ये खूप यशस्वी झाले आहे, असे सांगितले. त्यांनी गुजरातमधील भरुचमध्ये बोलताना त्यांनी दिल्लीतील शाळांचा संदर्भ देत सांगितले की, गुजरातमधील शाळांची अवस्था खरोखरच वाईट असून गुजरातमध्ये ६००० सरकारी शाळा आहेत, ज्या बंद करण्यात आल्या आहेत, अशी माहिती धिली
तसेच राज्यातील इतर अनेक शाळांची अवस्था बिकट आहे. ज्यामुळे लाखो मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. हे भविष्य आपण बदलू शकतो, जसे आम्ही दिल्लीतील शाळ बदलल्या आहेत.असे विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये परीक्षेदरम्यान पेपर फुटत आहेत. या बाबतीत राज्य जागतिक विक्रम करत आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देताना ते म्हणाले की, मी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना आव्हान देतो की, पेपर फुटल्याशिवाय एकच परीक्षा घ्यावी,तुम्ही मला संधी द्या, मी शाळा सुधारू शकत नसेल, तर तुम्ही मला काढून टाका, असे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीतील ४ लाख विद्यार्थी खासगी शाळांमधून दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये स्थलांतरित झाल्याचा दावा केजरीवाल यांनी केला, "दिल्लीमध्ये गरीब आणि श्रीमंतांची मुले एकत्र शिकत आहेत. यावेळी दिल्लीत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९९.७% होती. पुढे केजरीवाल म्हणाले की भाजपवाले लोक व्हॉट्सअॅपवर पसरवत आहेत की केजरीवालांच्या सरकारी शाळा खराब आहेत.. मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करतो की, या, आमच्या शाळा आणि रुग्णालये पाहा. अशी टीका करू नका, असे केजरीवाल यावेळी म्हणाले.
विशेष म्हणजे, दिल्लीबाहेर पहिल्या यशानंतर केजरीवाल गुजरातमधील आदिवासी भागात ठसा उमटवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यातील २७ आदिवासीबहुल जागांपैकी १५ जागा जिंकल्या होत्या.
गेल्या महिन्यात, AAP ने दावा केला होता की त्यांच्या अंतर्गत सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्ष गुजरातमध्ये सुमारे ५८ जागा जिंकण्याची शक्यता आहे.आजच्या मेळाव्यात केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये १ कोटींहून अधिक आदिवासी राहतात, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात गरीब आदिवासी दोन्ही एकाच राज्यातून येतात. ते म्हणाले की, एका बाजूला भाजप आणि काँग्रेस श्रीमंतांच्या पाठीशी उभे आहेतआणि त्यांना श्रीमंत बनवत आहेत. पण मी गरिबांच्या पाठीशी उभा आहे हे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे, असेही त्यांनी सांगितले.