Flipkart Big Billion Days : लवकरच सुरू होतोय फ्लिपकार्टचा सेल; मिळतील 'या' भन्नाट ऑफर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Flipkart Big Saving Days Sale

लवकरच सुरू होतोय फ्लिपकार्टचा सेल; मिळतील 'या' भन्नाट ऑफर्स

Flipkart Big Billion Days : फ्लिपकार्ट 4 मे पासून बिग सेव्हिंग डेज सेलचे आयोजन करत आहे. ऑनलाइन सेल 9 मे पर्यंत लाइव्ह असेल आणि ग्राहकांना सेल दरम्यान स्मार्टफोन आणि इतर ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सवर सवलत आणि ऑफर मिळू शकतात. कंपनीने सेल सुरू होण्याआधी Galaxy F12, Realme C20, Poco M3 आणि iPhone मॉडेल्स सारख्या लोकप्रिय स्मार्टफोन्सवर ऑफर जाहीर केल्या होत्या. Flipkart Plus सदस्यांना इतर ग्राहकांच्या तुलनेत 24 तास आधी याचा लाभ मिळतील. Flipkart नुसार, खरेदीदार SBI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांसाठी 10 टक्के इंस्टट डिस्काऊंट मिळेल.

ई-कॉमर्स वेबसाइटने आगामी फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलचे डिटेल्स मायक्रोसाइटवर शेअर केले आहेत. यात स्मार्टफोन्सची यादी दिली आहे ज्यावर सेल दरम्यान सूट दिली जाईल. Flipkart च्या मते, Poco, Redmi, Samsung, Vivo, Realme, Infinix आणि Moto चे स्मार्टफोन कमी किमतीत विकले जातील. मागील सेलप्रमाणेच आगामी बिग सेव्हिंग डेज सेल देखील ग्राहकांसाठी मर्यादित काळातील डील देईल ज्या केवळ विशिष्ट वेळी उपलब्ध असतील. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज 2022 4 मे पासून सुरू होईल तेव्हा तुम्ही स्मार्टफोन्सवर काही चांगल्या ऑफर्स मिळवू शकता.

हेही वाचा: Electric Scooter : तमिळनाडूत आणखी एक इलेक्ट्रिक स्कूटर आगीत खाक

या मोबाईल फोनवर ऑफर्स उपलब्ध असतील

Samsung Galaxy F22

सॅमसंग गॅलेक्सी F22 फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांच्या सवलतीच्या किमतीवर लिस्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्टच्या मते, या सवलतीच्या किमतींमध्ये ऑफर्सचा समावेश असेल. Samsung Galaxy F22 सध्या वेबसाइटवर 11,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. यात 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले, MediaTek Helio G80 प्रोसेसर आणि 48-मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

Poco M4 Pro

Poco M4 Pro 16,499 रुपयांना विकला जात आहे, तर त्याची MRP 19,999 रुपये आहे. फ्लिपकार्टच्या मते, बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान या ऑफरमध्ये स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये आहे. Poco M4 Pro Android 11-बेस्ड MIUI 12.5 वर काम करतो. जो MediaTek Helio G96 प्रोसेसरसह येतो. स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यात 64-मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे आणि 5,000mAh बॅटरी मिळते.

हेही वाचा: 'द्वेशाचं राजकारण' प्रकरणी माजी न्यायमूर्तींकडून PM मोंदीची पाठराखण

Redmi Note 10S

फ्लिपकार्ट सध्या 13,999 रुपयांमध्ये Redmi Note 10S विकत आहे. आगामी बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान, स्मार्टफोन 11,999 रुपयांच्या च्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध करून दिला जाईल. Redmi Note 10S मध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसर आहे, 6GB RAM सह. यात 6.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरी आहे. फोन 13-मेगापिक्सेल फ्रंट-फेसिंग कॅमेरासह 64-मेगापिक्सेल क्वाड कॅमेरा सेटअप सह येतो.

या स्मार्टफोन्स आणि इतर डील व्यतिरिक्त, नवीन लाँच केलेला Realme GT Neo 3 पहिल्यांदाच 4 मे रोजी फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. SBI डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि आणि EMI व्यवहारांवर 7,000 चा इंस्टंट डिस्काऊंट उपलब्ध असेल.

हेही वाचा: योगी सरकारच्या मोहिमेला मोठं यश! अवघ्या 6 दिवसात काढले 46000 भोंगे

Web Title: Flipkart Big Billion Days Sale Starts From 4 May Check What Are The Offers Here

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :flipkart
go to top