
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकारणापासून दूर असलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पुनरागमन करताना पर्यायी राजकारणावर भर देत आज आम आदमी पक्षाच्या ‘असोसिएशन ऑफ स्टुडंट्स फॉर अल्टरनेटिव्ह पॉलिटिक्स’ (एएसएपी) या विद्यार्थी संघटनेच्या स्थापनेची घोषणा केली.