
कुण्या काळी काँग्रेसचा विशेषत: माजी मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित यांचा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ म्हणजे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ. पण, २०१३ ला आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला खेचून घेतला आणि स्वत: मागील २ विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेत. त्यानंतर ही केजरीवालांची तिसरी निवडणूक असणार आहे. पण, यंदा केजरीवालांसमोर दोन बड्या पक्षांच्या मोठ्या उमेदवारांचं आव्हान असणार आहे. ते उमेदवार कोण आणि आव्हान काय समजून घेऊयात...