काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

काँग्रेस दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली ( Arvinder Singh Lovely resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Arvinder Singh Lovely
Arvinder Singh Lovely

नवी दिल्ली- काँग्रेस दिल्ली प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली ( Arvinder Singh Lovely resigns) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षासोबत काँग्रेसने आघाडी केल्यामुळे राजीनामा देत असल्याचं ते म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुका सुरु असताना काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

अरविंदर सिंग लवली यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून राजीनाम्यामागचं कारण सांगितलं आहे. ते म्हणालेत की, दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष ज्या पक्षाच्या विरोधात होता. त्याच पक्षासोबत काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिली आहे. ( Delhi Congress president )

Arvinder Singh Lovely
Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

दिल्ली काँग्रेस त्या पक्षाच्या विरोधात होती जी काँग्रेस पक्षाला खोटारडं म्हणत होती, भ्रष्टाचाराचे आरोप लावत होती. असं असताना दिल्ली काँग्रेसने आम आदमी पक्षासोबत आघाडी केली आहे. मी या निर्णयाचा सन्मान केला. महासचिवांच्या आदेशाने मी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या रात्री सुभाष चोपडा आणि संदीप दीक्षित यांच्यासोबत घरी देखील गेलो होतो. माझी इच्छा नव्हती तरी मी गेलो होते, असं अरविंदर सिंग लवली म्हणाले.

Arvinder Singh Lovely
Latur Lok Sabha Election : निवडणुका आल्या की नौटंकी सुरु; काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीचा मोदींवर हल्लाबोल

जड अंतकरनाने मी पत्र लिहित आहे. मी या पक्षामध्ये स्वत:ला लाचार समजत आहे. मी आता दिल्लीच्या अध्यक्षपदावर राहू शकत नाही, असं ते पत्रात म्हणाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंदर सिंग लवली यांचे आणि दिल्ली काँग्रेस प्रभारी महासचिव दीपक बबरिया यांच्यासोबत वाद सुरु आहेत. याच कारणामुळे त्यांनी अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं बोललं जातं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com