Owaisi on Bihar Election : ओवेसींनी बिहारबाबत घेतला मोठा निर्णय ; तेजस्वी यादव यांना बसणार मोठा दणका?

Bihar Vidhansabha Election 2025 Update : बिहारमध्ये राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे आणिसर्वच राजकीय पक्ष उमेदवारी याद्या जाहीर करू लागले आहेत.
AIMIM chief Asaduddin Owaisi announces a major decision ahead of the Bihar Assembly Election, creating political tension for Tejashwi Yadav and RJD.

AIMIM chief Asaduddin Owaisi announces a major decision ahead of the Bihar Assembly Election, creating political tension for Tejashwi Yadav and RJD.

esakal

Updated on

Asaduddin Owaisi Strategy for Bihar Assembly Election : बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि राज्यात राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.सर्वच राजकीय पक्ष उमेदवारी याद्या जाहीर करू लागले आहेत. तर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांची इंडाय आघाडीकडून अद्याप अधिकृतपणे जागा वाटप जाहीर झालेलं नाही. मात्र, प्राप्त माहितीनुसार या दोन्ही आघाड्यांचे जागा वाटपाचे सूत्र निश्चत झाले असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होवू शकते. 

 दरम्यान एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा यंदाही बिहारमध्ये निवडणुकीच्या रिंगणात आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत लढवलेल्या जागांपेक्षा यंदा एमआयएम पाच पट जास्त म्हणजे १०० जागा लढवण्याचा विचारात आहे. त्यामुळे हा एकप्रकारे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठा धक्का आहे. कारण, एमआयएम पक्ष हा विरोधी पक्षांची मतं खेचणार हे स्पष्टच आहे.

याबाबत एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान म्हणाले की, पक्षाचे ध्येय बिहारमध्ये अधिक जागा लढवून तिसरा पर्याय निर्माण करणे आहे.  कोणताही पक्ष असा दावा करू शकत नाही की एआयएमआयएमने धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन केले आहे, कारण पक्षाने बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांच्या राजदशी युतीसाठी संपर्क साधला होता, मात्र, महाआघाडीने ओवेसींच्या पक्षाचा प्रस्ताव स्वीकारला नाही.

AIMIM chief Asaduddin Owaisi announces a major decision ahead of the Bihar Assembly Election, creating political tension for Tejashwi Yadav and RJD.
Bihar Assembly Election : बिहार निवडणुकीसाठी I.N.D.I.A आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र ठरले? ; लवकरच घोषणा!

दरम्यान, असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये  ३२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली गेली आहे. एकूणच ओवेसी यांच्या पक्षाने बिहारमध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे आणि लवकरच औपचारिक घोषणा होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com