'देशात अजूनही गोडसेंच्या औलादी जिवंत'

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम 370 ला रद्द करण्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेचा भडीमार सुरू केला आहे. एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील सरकारला लक्ष्य बनविले.

ओवैसी म्हणाले, ज्या प्रकारे जम्मू-काश्मीरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे, त्यामुळे तेथील परिस्थिती आणखी खराब झाली आहे. मला माहिती आहे की, एक दिवस मलादेखील गोळी घातली जाईल, या देशातील गोडसेंच्या अवलादी असं नक्की करू शकतात. 

'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना ओवैसी म्हणाले, "काश्मीरमध्ये यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण केली गेली आहे. तेथे कोणतेही संपर्कयंत्रणा सुरू नाही. तसेच लोकांनाही बाहेर पडण्यासाठी मज्जाव केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारतीय संवैधानिक प्रक्रियेनुसार निर्णय घ्यावेत आणि तेथील कर्फ्यू लवकरात लवकर हटवावा.'' 

जे काश्मीरमधील जनतेसोबत झाले, ते नागालँड, मिझोराम, मणिपूर, आसाम आणि हिमाचल प्रदेश येथील जनतेबाबतही होऊ शकते, असेही ओवैसी म्हणाले. 

तुमच्या भाषणामुळे पाकिस्तानला मदत होते आहे, असा आरोप तुमच्यावर केला जात आहे, असा प्रश्न विचारल्यानंतर ओवैसी म्हणाले की, जे मला अॅण्टी नॅशनल म्हणत आहेत, ते लोक स्वत: राष्ट्रविरोधी आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asaduddin Owaisi comment on Modi government over Jammu Kashmir issue