
‘ही पहिली एफआयआर, जी गुन्हा काय आहे हे स्पष्ट करीत नाही’
नवी दिल्ली : हैदराबादचे खासदार व एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याबद्दल गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ‘मला एफआयआरचा एक उतारा मिळाला आहे. मी पाहिलेली ही पहिली एफआयआर आहे, जी गुन्हा काय आहे हे स्पष्ट करीत नाही... आम्ही याला घाबरणार नाही’ असे ट्विट त्यांनी प्रतिक्रिया देताना केले. द्वेषयुक्त भाषणावर टीका आणि द्वेषयुक्त भाषण यांची तुलना होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. (Asaduddin Owaisi said on the FIR filed against the provocative statement)
ज्या लोकांविरुद्ध दिल्ली पोलिसांनी कथित प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या यादीत असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय स्वामी यती नरसिंहानंद, नूपुर शर्मा, नवीन जिंदाल यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (ता. ९) सुमारे ३१ जणांविरुद्ध द्वेषयुक्त संदेश पसरवणे, विविध गटांना भडकावणे आणि शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते अशी परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सुमोटो घेताना दिल्ली पोलिसांनी दोन्ही एफआयआर नोंदवले आहेत. नूपुर शर्माच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सोशल मीडियाचे विश्लेषण केल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. नूपुर शर्माच्या वक्तव्यापूर्वी आणि नंतर जे काही ट्विट झाले. तसेच सोशल मीडियावर आलेल्या वादग्रस्त विधानांची (provocative statement) चौकशी केल्यानंतर पोलिसांनी स्वत: दोन्ही एफआयआर नोंदवले आहेत.
हेही वाचा: Presidential Election : राष्ट्रपती निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान
एफआयआरमध्ये कोणा कोणाचे नाव?
गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये नूपुर शर्मा, नवीन कुमार जिंदाल, असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi), स्वामी यती नरसिंहानंद, पीस पार्टीचे शादाब चौहान, पत्रकार साबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार, मिना आणि हिंदू महासभेची पूजा शकुन पांडे यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्ली पोलिस आता आरोपींना समन्स बजावण्याची प्रक्रिया सुरू करणार आहेत.
Web Title: Asaduddin Owaisi Said On The Fir Filed Against The Provocative Statement
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..