

Asaram Bapu
esakal
आसाराम बापूंच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांना मोठा झटका दिला आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापू यांना सुप्रीम कोर्टाने सध्या अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. ८५ वर्षीय आसाराम यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत जामिनाची मागणी केली होती. जोधपूर येथील एम्स (AIIMS) रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे, कोर्टाने या टप्प्यावर जामीन देणे आवश्यक मानले नाही.