Asha Worker Sexually Assaulted on Job Promise
दिल्लीमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत आशा स्वयंसेविकेवर दोन वर्ष लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इतकंच नाही तर आरोपीने तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओही व्हायरल करण्याची धमकी देखील दिली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे ही घटना घडली असून याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आल्याही माहिती आहे.