Ashok Gehlot's Vasundhara Raje Bombshell Amid Row With Sachin Pilot
Ashok Gehlot's Vasundhara Raje Bombshell Amid Row With Sachin Pilotesakal

भाजपच्या बड्या नेत्यानं वाचविलं काँग्रेसचं सरकार; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची खळबळजनक कबुली

Published on

ढोलपूर, राजस्थान: वसुंधरा राजे आणि भाजपच्या दोन आमदारांनी २०२०मध्ये माझे सरकार वाचविले होते, अशी खळबळजनक कबुली राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली.

काँग्रेसचे नेते सचिन पायलट आणि इतर १८ आमदारांनी जुलै २०२०मध्ये गेहलोत यांच्याविरुद्ध बंड केले होते. सुमारे महिनाभर चाललेल्या या प्रकरणात शेवटी पायलट यांनी उपमुख्यमंत्रिपदावरून आणि प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर हे बंड शमले होते. या प्रकारावर गेहलोत यांनी येथील एका कार्यक्रमात जाहीर भाष्य केले.

बंडखोरी केलेल्या आमदारांनाही गेहलोत यांनी यावेळी आवाहन केले. ते म्हणाले, `` भाजपकडून घेतलेले पैसे परत करून टाका म्हणजे तुम्हाला कोणत्याही दबावाशिवाय तुमचे कर्तव्य पार पाडता येईल.``

Ashok Gehlot's Vasundhara Raje Bombshell Amid Row With Sachin Pilot
Crime News: नात्याला काळीमा फासणारी घटना; रागाच्या भरात पत्नीची दोरीने गळा आवळून हत्या; नातेवाइकांचा आरोप

सरकार कसे वाचले याबाबत गेहलोत म्हणाले, ``भारतीय जनता पक्षाच्या तीन नेत्यांमुळे माझे सरकार वाचले. त्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विधानसभेचे माजी अध्यक्ष कैलास मेघवाल आणि आमदार शोभाराणी कुशवाह यांचा समावेश होता. ``

``केंद्रीय मंत्री अमित शहा, गजेंद्रसिंह शेखावत आणि धर्मेंद्र प्रधान यांनी माझे सरकार पाडण्याचा कट रचला. त्यांनी पैसे वाटले. आता ते पैसे परत घेत नाहीत. आमदारांकडून ते पैसे का मागत नाहीत, याचे आश्चर्य वाटते,`` असा दावाही त्यांनी केला.

Ashok Gehlot's Vasundhara Raje Bombshell Amid Row With Sachin Pilot
धक्कादायक: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीला ५० हजारात विकले

``तुम्ही जे काही दहा कोटी, वीस कोटी रुपये घेतले असतील व त्यातील जे काही खर्च केले असतील ती रक्कम मी तुम्हाला देतो किंवा ती रक्कम मी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून घेऊन तुम्हाला देतो, ते पैसे त्यांना परत द्या, `` असे आवाहनही गेहलोत यांनी आमदारांना केले.

``पक्षाने मला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री केले आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम माझे आहे. जुने सर्व विसरून एकत्र या व विधानसभेच्या पुढील निवडणुकीला सामोरे जाऊ या,`` असे आवाहनही गेहलोत यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com