
काँग्रेस सोडल्यानंतर अश्विनी कुमार म्हणाले, चुकीला चुक म्हणण्याची वेळी आलीय
नवी दिल्ली : माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी मंगळवारी (ता.१५) काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. भाजपमध्ये जाणार नसल्याचे त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले. याबाबत विचार केलेले नाही. मी भाजपमधील कोणाशी ही भेटलेलो नाही. आता कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणत्याही पक्षात सामील होण्याचा विचार नाही. आता कोणतीही घाई नाही. अश्विनी कुमार म्हणाले, की होऊ शकतो मी चुकीचा असेल. मात्र भविष्यात काँग्रेसला (Congress Party) मी केवळ रसतळाला जात असल्याचे पाहात आहे. ज्या प्रकारचे नेतृत्व पंजाबमध्ये दिले गेले, ते गेल्या ४० वर्षांपेक्षा सर्वात खराब आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarindar Singh) यांना अपमानित केले गेले. त्यांना राजीनामा द्यायला उद्युक्त केले गेले आहे.(Ashwani Kumar Reaction After Quits Congress Party)
हेही वाचा: Bhargavi Narayan | प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे निधन
त्याने काँग्रेसवर कोणताही परिणाम झालेला नाही. मी याने दुःखी आहे. मी याची निंदा करतो. ४० वर्षांपेक्षा अधिक वर्षांपर्यंत काँग्रेसबरोबर राहिल्यानंतर निवडणुका दरम्यान पक्ष सोडल्याबद्दल ते म्हणाले, की एक वेळ अशी येते की तुम्ही जास्त वेळ सहन करु शकत नाहीत. माझी अनेक दिवसांपासून झोप उडाली आहे. मी स्वतः विचार केला की इतका सहनशीलता न राहिल्याने मी का चिकटून राहू ? मला वाटते, वेळ आली आहे की चुकीला चुक म्हटले पाहिजे आणि कठीण निर्णय घेतला जावा.
हेही वाचा: Honda Activa 6G चे स्टँडर्ड व्हेरिएंट कमी किंमतीत करा खरेदी, जाणून घ्या तपशील
यापूर्वीच अश्विनी कुमार (Ashwani Kumar) यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना राजीनामा पाठविला. त्यात म्हटले, की पक्षाबाहेर राहून चांगल्या प्रकारे काम करु शकतो. ते मनमोहन सिंग सरकारच्या काळात ते कायदा मंत्री होते. गेल्या ४६ वर्षांपासून ते काँग्रेसमध्ये होते.
Web Title: Ashwani Kumar Reaction After Quits Congress Party
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..