Video : मीडियावर फेकलेल्या शाईचे थेंब माझ्यावर उडाले : राज्यमंत्री चौबे

टीम ईसकाळ
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे पटनामधील पीएमसीएच रूग्णालयात डेंगीच्या रूग्णांना भेट द्यायला गेले असता, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे.

पटना : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे पटनामधील पीएमसीएच रूग्णालयात डेंगीच्या रूग्णांना भेट द्यायला गेले असता, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. आज (ता. 15) सकाळी हा घटना घडली. या घटनेनंतर रूग्णालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. त्यानंतर चौबे यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

पोटभर जेवणासाठी संघर्ष; भारतात 'या' देशांपेक्षा जास्त भूकबळी

पटनातील पीएमसीएच रूग्णालयात राज्यमंत्री चौबे डेंग्यू पिडितांच्या चौकशीसाठी गेले होते. बिहारमध्ये सध्या डेंगीची साथ पसरली असून, मोठ्या प्रमाणात नागरिकांना डेंगीने पछाडले आहे. यामुळे आरोग्य राज्यमंत्री रूग्णांना भेटायला गेले होते. यावेळी भेच घेऊन परत गाडीकडे येताना त्यांच्यावर एक अज्ञात व्यक्तिने शाई फेकली. या शाईचे काही थेंब त्यांच्या अंगावर उडाले. यावर माध्यमांनी त्यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, 'ही शाई माझ्यावर फेकण्यात आलेली नसून ती मीडियावर फेकण्यात आली होती. त्यापैकी काही थेंब माझ्या अंगावर उडाले आहेत.' त्यांच्या या हास्यास्पद उत्तरामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. शाई फेकणाऱ्या व्यक्तिने तेथून पळ काढला, त्यामुळे नक्की कोणी आणि कशासाठी शाई फेकली हे गुपितच आहे. 

डेंगीचे रूग्ण वाढतंच आहेत..
बिहारमध्ये डेंगीचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढले असून दिवसेंदिवस त्याची संख्या वाढतच आहे. पटना मेडिकल कॉलेजमध्ये सर्वाधिक डेंगीचे रूग्ण दाखल आहेत. एका कॉटवर दोन दोन रूग्णांना झोपवण्याची वेळ आली आहे. तर काही रूग्ण जमिनीवरच झोपले आहेत. दिनस रात्र रूग्णांची लाईन लागली आहे. सप्टेंबरपासून या डेंगीच्या साथीला सुरवात झाली असून अजूनही त्याचे प्रमाण कमी झालेले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ashwini Choube says Ink on Media is equals to an ink attack on me