पोटभर जेवणासाठी संघर्ष; भारतात 'या' देशांपेक्षा जास्त भूकबळी

टीम ई-सकाळ
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : भारतात सध्या आर्थिक मंदी आहे की नाही, यावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्याचवेळी देशातील लोकसंख्येचा एक मोठा घटक पोटभर जेवणासाठी संघर्ष करताना दिसत आहे. हे कोणतेही राजकीय वक्तव्य किंवा आरोप नसून, जागातील भूकबळींच्या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी आहे.

नवी दिल्ली : भारतात सध्या आर्थिक मंदी आहे की नाही, यावरून उलट-सुलट चर्चा सुरू आहे. त्याचवेळी देशातील लोकसंख्येचा एक मोठा घटक पोटभर जेवणासाठी संघर्ष करताना दिसत आहे. हे कोणतेही राजकीय वक्तव्य किंवा आरोप नसून, जागातील भूकबळींच्या सर्वेक्षणातून समोर आलेली आकडेवारी आहे.

पाच वर्षांत एक कोटी रोजगार; भाजपचा जाहीरनामा

निर्देशांकात भारत कोणत्या स्थानावर?
जागतिक भूक निर्देशांक जाहीर करण्यात आला असून, यात भारताची स्थिती बिकट आहे. भारत शेजारच्या चीन, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही मागे आहे. धक्कादायक म्हणजे, इराक आणि अल्जेरियासारख्या देशांपेक्षा भारतात भूकबळींची संख्या जास्त आहे. वेल्थहंगरलाईफ अँड कन्सर्न वर्ल्ड वाइड या संस्थेने जगातील भूकबळींसंदर्भात सर्वेक्षण केले असून, त्याबाबतच अहवाल सादर केला आहे. त्यात 119 देशांमध्ये भारत 103व्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान 106व्या स्थानावर आहे. भारतातपेक्षा पाकिस्तानात भूकबळींची संख्या जास्त असल्याचं अहवालात म्हटलंय.

अभिजित बॅनर्जी : न्याय योजनेचे शिल्पकार आणि नोटाबंदीचे विरोधक

भारताची स्थिती चिंताजनक
संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार निर्देशांकात पहिल्या क्रमांकावर असणे हे चांगले लक्षण असून, त्यात देशात भूकबळी नसल्याचे लक्षण आहे. तर 100 वा क्रमांक धोक्याची घंटा असल्याचे सांगण्यात आले आहे. भारताचा क्रमांक 100पेक्षाही पुढे असल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. जगातील 45 देशांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. दुदैवाने भारताचाही त्यात समावेश आहे. सर्वेक्षणानुसार जगातील कुपोषणाची टक्केवारी 17.6 टक्क्यांवरून 12.3 टक्क्यांवर आली आहे. ही अर्थातच चांगली गोष्ट आहे. पण, त्याचवेळी काही देशांमधील डेटाच उपलब्ध झाला नसल्याचे सर्वेक्षण करणाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कुपोषण कमी झाले, असे थेट विधान धाडसाचे असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. 

चीन कितव्या स्थानावर?
आधीच्या सर्वेक्षणाप्रमाणेच आफ्रिकेतच सर्वाधिक भूकबळी आहेत. त्यानंतर दक्षिण आशियातील देशांचा क्रमांक लागत आहे. दक्षिण आशियातील देशांमध्ये लोकसंख्या आणि लोकसंख्येची घनता दोन्ही जास्त आहे. त्यामुळे भूकबळींची संख्या सर्वाधिक दिसते. तरीही जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेला आणि भारताचा प्रतिस्पर्धी असलेला चीन 25व्या स्थानावर आहे. भारतात सध्या आर्थिक मंदी आहे. त्यामुळे भविष्यात भारतात आणखी बिकट परिस्थिती उद्भवण्याची भीतीदेखील व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: global hunger index 2019 India ranks 109 below neighbouring countries