

Asian Fisheries
sakal
तिरुअनंतपूरम : आशियातील सागरी मासेमारीत घटत असल्याने अनेक देश वेगाने मत्स्यपालनाकडे वळत आहेत, असे एका प्रादेशिक अहवालाच्या प्राथमिक निष्कर्षात म्हटले आहे. बे ऑफ बंगाल प्रोग्रॅम इंटर-गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन (बीओबीपी-आयजीओ) च्या अहवालानुसार, भारताने अंतर्गत मत्स्यपालनात सर्वाधिक वेगाने वाढ नोंदविली आहे. देशात या २०१४ च्या तुलनेत २०२३ मध्ये जवळपास १६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.