esakal | कोण आहेत अखिल गोगोई? तुरुंगातून भाजपला देतायत टक्कर

बोलून बातमी शोधा

Akhil Gogoi

गोगोईंनी धरणे आणि जमिनींच्या मुद्द्यांवरून सरकारचा वारंवार विरोध करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

कोण आहेत अखिल गोगोई? तुरुंगातून भाजपला देतायत टक्कर
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Assam Assembly election 2021 Live : दिसपूर : आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला तो नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA). केंद्र सरकारने पारित केलेल्या या कायद्याविरोधात अखिल गोगोई यांनी आवाज उठविला होता. यंदा पार पडलेली विधानसभा निवडणूक गोगोई यांनी तुरुंगातून लढवली आहे. शिवसागर मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत.

आसाममधील शेतकऱ्यांचे नेते ही गोगोईंची विशेष ओळख. एक वर्षांपासून तुरुंगात असलेल्या गोगोईंना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA) ने अटक केली होती. देशद्रोह आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन केल्यामुळे गोगोईंना अटक करण्यात आली होती.

हेही वाचा: Live : केरळचा कौल LDFला

या विधानसभा निवडणुकीत गोगोई यांनी रायजोर दलाची स्थापना केली. आत्मनिर्भर आसामसाठी रायजोर दल निवडणूक लढवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. हिंसक निदर्शने आणि बेकायदेशीरपणे लोकांना एका ठिकाणी जमा केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे गोगोईंविरोधात मुद्दाम कट रचला जात असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.

गोगोईंनी धरणे आणि जमिनींच्या मुद्द्यांवरून सरकारचा वारंवार विरोध करत आहेत. फेब्रुवारी महिन्यात न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.