'त्या ट्विटमध्ये आम्ही का नाही?' राहुल गांधींविरोधात महिलांची तक्रार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'त्या ट्विटमध्ये आम्ही का नाही?' राहुल गांधींविरोधात महिलांची तक्रार दाखल

'त्या ट्विटमध्ये आम्ही का नाही?' राहुल गांधींविरोधात महिलांची तक्रार दाखल

गुवाहाटी: आसाममधील भाजपच्या महिला मोर्चाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात आता तक्रार दाखल केली आहे. दिसपूर पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली असून राहुल गांधींविरोधात त्यांनी व्यक्त केलेल्या आक्षेपाचं कारणही वेगळं आहे. अंगुरलता डेका यांच्या नेतृत्वाखाली ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Assam BJP Mahila Morcha)

या महिला मोर्चामधील महिलांचं असं म्हणणं आहे की, राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये 'गुजरात ते पश्चिम बंगाल' असा उल्लेख केला आहे. मात्र, त्यांनी नॉर्थ-इस्ट राज्यांचा उल्लेख केला नाहीये. ते आम्हाला भारताचा भाग समजत नाहीत, असा आरोप या भाजप महिला मोर्चाने केला आहे.

काय होतं राहुल गांधींचं ट्विट?

राहुल गांधी यांनी 10 फेब्रुवारी रोजी एक ट्विट केलंय. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, आपल्या एकतेमध्येच आपली ताकद आहे. संस्कृतीची एकता, विविधतेतील एकता, भाषेांमधील एकता, लोकांमधील एकता, राज्यांमधील एकता... काश्मीरपासून केरळपर्यंत... गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत... भारत हा त्यांच्या सर्व रंगामुळे सुंदर आहे. भारताच्या या आत्म्याचा अपमान करु नका.

मात्र, या ट्विटमध्ये उत्तर-पूर्व राज्यांचा उल्लेख नाहीये, असा दावा या महिलांनी केला आहे. त्यांच्या ट्विटमध्ये आपल्या राज्यांचा उल्लेख का नाही, यामुळे संतप्त झालेल्या या महिलांनी त्यांच्याविरोधात आता तक्रार दाखल केली आहे.

टॅग्स :AssamRahul Gandhi