Assam BJP News : आसाममध्ये भाजपला मोठा हादरा! माजी केंद्रीय मंत्र्यासह १८ नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

Assam BJP setback : जाणून घ्या, राजीनामा देण्यामागे नेमकं काय कारण सांगितलं आहे भाजपच्या दिग्गज नेत्याने?
Former Union Minister Rajen Gohain and 18 BJP leaders announce their resignation in Assam, marking a major political jolt to the ruling party.

Former Union Minister Rajen Gohain and 18 BJP leaders announce their resignation in Assam, marking a major political jolt to the ruling party.

esakal

Updated on

Rajen Gohain Resigns from BJP : आसाममध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा हादरा बसला आहे. कारण, या ठिकाणी माजी केंद्रीयमंत्री आणि चारवेळा खासदार राहिलेले राजेन गोहेन यांना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्यसोबत एकूण १७ सदस्यांनीही पक्ष सोडला आहे. राजन गोहेन यांनी हा निर्णय राज्य भाजपा अध्यक्ष दिलीप सैकिया यांना पत्र लिहून कळवला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ते पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व जबाबदाऱ्यांमधून तत्काळ प्रभावाने बाजूला होत आहेत.

या कारणामुळे दिला राजीनामा -

सूत्रांच्या माहितीनुसार राजीनामा देणारे बहुतांश सदस्य अप्पर आणि मध्य आसाममधील आहेत. राजेन गोहेन यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, त्यांनी राजीनामा यासाठी दिला कारण, पक्षाने आसामच्या जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही आणि स्थानिक समुदायाचा विश्वासघात केला अन् बाहेरील लोकांना राज्यात स्थायिक होण्याची परवानगी दिली.

१९९९ ते २०१९ पर्यंत खासदार होते गोहेन –

राजेन गोहेन हे १९९९ ते २०१९ पर्यंत नागांव लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. २०१६ ते २०१९ पर्यंत रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्री होते. शिवाय त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळलेली आहे. राजेश गोहेन हे व्यावसायिकदृष्ट्या चहाच्या बागेचे मालक आहेत. याशिवाय त्यांचा अन्य क्षेत्रांमध्येही चांगला प्रभाव आहे. आता त्यांनी पक्ष सोडल्याने भाजपचे मोठे नुकसान होवू शकते.

Former Union Minister Rajen Gohain and 18 BJP leaders announce their resignation in Assam, marking a major political jolt to the ruling party.
Prashant Kishor Bihar Election 2025 : प्रशांत किशोर निवडणूक लढवणार नाही? ; जन सूराज पार्टीची पहिली उमेदवार यादी जाहीर

आसामध्ये सध्या मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचे सरकार आहे. तर पुढील वर्षांत आसाममध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. खरंतर आसामध्ये भाजप विजयाची हॅटट्रिक करू इच्छित आहे. अशावेळी दिग्गज नेत्यासह अन्य नेत्यांनी पक्ष सोडल्याने भाजपसाठी हा मोठा हादरा मानला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com