esakal | VIDEO : आसाम बोट दुर्घटनेत एकाचा मृत्यू, दोन बेपत्ता
sakal

बोलून बातमी शोधा

VIDEO : आसाम बोट दुर्घटनेत एकाचा मृत्यू, दोन बेपत्ता

बोट दुर्घटनेतील दोघे बेपत्ता असून एका महिलेचा यात मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी दिली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

VIDEO : आसाम बोट दुर्घटनेत एकाचा मृत्यू, दोन बेपत्ता

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आसाममध्ये बुधवारी सांयकाळी ब्रह्मपुत्रा नदीत नाव उलटली. दोन बोटींची धडक झाल्यानंतर एक बोट नदीत बुडाली. यात दुर्घटनेनंतर ३० हून अधिक लोकांनी स्वत:चा जीव वाचवला. याशिवाय 45 जण बेपत्ता होते. जवळपास 45 जणांना वाचवण्यात यश आले आहे. बोट दुर्घटनेतील दोघे बेपत्ता असून एका महिलेचा यात मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी दिली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, माजुली इथे दोन बोटींची समोरा समोर धडक झाली. दोन्ही बोटी या माजुली घाटापासून १०० मीटर अंतरावर होत्या. यात २५ ते ३० दुचाकीसुद्धा होत्या अशी माहिती समोर आली आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी याबाबत काल माहिती देताना म्हटलं होतं की, दोन बोटी धडकल्यानंतर एक बोट बुडाली होती. यात किती लोक होते याची माहिती मिळणं कठीण आहे. मात्र बोटीवरील ४२लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. बुधवारी रात्री ४ जण बेपत्ता होते अशी माहिती त्यांनी दिली होती.

हेही वाचा: हरयाणात शेतकरी आक्रमक; इंटरनेट, SMS सेवा बंद

एनडीआरएफचे पथकाकडून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. राज्याचे मंत्री बिमल बोहरा यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले होते. तसंच आज मुख्यमंत्री निमती घाटावर जाणार आहेत.

loading image
go to top