esakal | हरयाणात शेतकरी आक्रमक; इंटरनेट, SMS सेवा बंद
sakal

बोलून बातमी शोधा

हरयाणात शेतकरी आक्रमक; इंटरनेट, SMS सेवा बंद

मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना २५ लाखांची नुकसान भरपाई आणि आय़एएस आयुष सिन्हा यांच्या निलंबनाची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.

हरयाणात शेतकरी आक्रमक; इंटरनेट, SMS सेवा बंद

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कर्नाल - हरयाणात सुरु असलेले शेतकरी आंदोलक आता आक्रमक झाले आहेत. कर्नालमध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना २५ लाखांची नुकसान भरपाई आणि आय़एएस आयुष सिन्हा यांच्या निलंबनाची मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. कर्नालमध्ये शेतकरी आक्रमक झाल्यानं प्रशासनाने कठोर पावले उचलली आहे. आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद केली आहे. बुधवारी शेतकरी नेते आणि जिल्हा प्रशासनात झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कर्नालमध्ये धरणे आंदोलन करणार असल्याची घोषणा केली.

हरयाणाच्या गृह विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, कर्नालमध्ये शतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरू नयेत यासाठी जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. हा आदेश गुरुवारी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

शेतकरी आणि प्रशासनामध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. यात प्रशासनाकडून जिल्हाधिकारी निशांत यादव आणि पोलिस अधीक्षक गंगाराम पुनिया हे उपस्थित होते. याशिवाय रेंज कमिश्नर यांच्यासोबतही शेतकऱ्यांची चर्चा झाली. या बैठकीनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितलं की, प्रशासनाने दर अर्ध्या तासाने संवाद साधला पण यात असा कोणताच प्रस्ताव आला नाही ज्यावर एकमत होऊ शकेल. आयएएस अधिकारी आयुष यांच्यावर गुन्हा दाखल करून निंलबनाची कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा: एम्समध्ये होणार नेजल व्हॅक्सिनची क्लिनिकल ट्रायल

पोलिसांनी 28 ऑगस्टला बसटाडा टोल प्लाझा इथं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला होता. यामध्ये जखमी झालेल्या कर्नालमधील शेतकरी सुशील काजल याचा मृत्यू झाला होता. याविरोधात 7 सप्टेंबरला कर्नालमध्ये शेतकऱ्यांना महापंचायत भरवली होती. तसंच हरयाणा सरकारकडे आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन आणि मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी असी मागणी केली.

loading image
go to top