Assam CM Himanta Biswa Sarma announces shoot-at-sight order in Dhubri district following violent clashes and rising law and order concerns.
Assam CM Himanta Biswa Sarma announces shoot-at-sight order in Dhubri district following violent clashes and rising law and order concerns.esakal

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Assam CM Himanta Biswa Sarma issues shoot-at-sight order: दुर्गापूजेदरम्यान धुबरी जिल्ह्यात हा आदेश लागू राहील, असंही त्यांनी सांगितले.
Published on

Why Shoot-at-Sight Was Declared in Dhubri District: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, १३ जूनपासून धुबरी जिल्ह्यात झालेल्या जातीय दंगलीनंतर रात्रीच्या वेळी दिसताच गोळी झाडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

दुर्गापूजेदरम्यान धुबरी जिल्ह्यात हा आदेश लागू राहील. त्यांनी सांगितले की, सनातन धर्माचे लोक धुबरीमध्ये अल्पसंख्याक आहेत आणि कट्टरपंथीयांपासून त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची प्राथमिकता आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान हिमंता बिस्वा सरमा यांनी हे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की धुबरीमध्ये कोणतीही अशांतता किंवा हिंसाचाराच्या घटना सध्या घडत नाहीत, परंतु दुर्गापूजेदरम्यान शूट अ‍ॅट साईटचा आदेश लागू राहील. दुर्गापूजेचा उत्सव २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जाईल.

सरमा म्हणाले, "धुबरीमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणालाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल."  तसेच, मुख्यमंत्र्यांनी १३ जून रोजी धुबरीला भेट दिली होती आणि घोषणा केली होती की बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यात रात्रीच्या वेळी दिसताच गोळ्या घालण्याचे आदेश लागू केले जातील, कारण एक जातीय गट अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, जे सरकार सहन करणार नाही. असंही मुख्यमंत्री सरमांनी सांगितलं होतं.

Assam CM Himanta Biswa Sarma announces shoot-at-sight order in Dhubri district following violent clashes and rising law and order concerns.
Himachal Pradesh man carries wife’s body : डोळ्यात अश्रू अन् पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन ‘तो’ तब्बल १८ तास ३५ किमी चालला!

याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की बकरी ईदच्या एक दिवसानंतर जिल्हा मुख्यालयातील हनुमान मंदिरासमोर गायीची हाडे आढळली होती. यानंतर हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांना शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन केले होते. तथापि, दुसऱ्या दिवशी मंदिरासमोर पुन्हा गायीचे डोके ठेवण्यात आले, तर दगडफेकीच्या घटनाही घडल्या. तर ८ जून रोजी, सरमा म्हणाले होते की बकरी ईदच्या सणात अनेक ठिकाणी अनेक गुरांची बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली आणि आसाममध्ये अनेक ठिकाणी मांसाचे तुकडे फेकण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com