
Himachal Pradesh news: हिमाचल प्रदेशमधून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका व्यक्तीने चक्क आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेवून, तब्बल १८ तास ३५ किमी सलग पायी प्रवास केला आणि अखेर तो त्याच्या गावी पोहचला.
एवढंच नाहीतर तो ज्या मार्गाने जात होता तो मार्गही अत्यंत खडकाळ, डोंगराळ होता. शिवाय, त्यात भर म्हणून पाऊसही सुरू होता. अतिशय कठीण अशा परिस्थितीत गुलशन कुमार या व्यक्तीने त्यांच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत असा अखेरचा प्रवास केला. जो ऐकूनच आपल्या अंगावर काटा येईन.
गुलश कुमार याला त्याची पत्नी उषा देवी यांचे पार्थिव गावी नेण्यासाठी तब्बल ३५ किमी चालावे लागले. सोमवारी रात्री उशीरा तो त्याच्या धग्गर या गावी पोहोचला. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे कठुआ ते धग्गरचा थेट रस्ते संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीत तो हिमाचलमार्गे गावात पोहोचला, ज्यामुळे पाच तासांच्या प्रवासाला १८ तास लागले.
गुलश कुमारची पत्नी उषा देवी गर्भवती होती. तिला बानी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे बाळाचा मृत्यू झाला आणि तिची प्रकृती गंभीर झाल्याने तिला कठुआ येथील रूग्णालयात हलवण्यात आले. जिथे तिचाही मृत्यू झाला. कुटुंबीयांची इच्छा होती की, तिच्या मूळ गावीच तिच्यावर अंत्यसंस्कार व्हावेत.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून कठुआ जिल्ह्यात पाऊस पडत आहे या परिस्थितीत भूस्खलनामुळे गुलशनच्या गावाकडे जाणारा रस्ताही बंद झाला होता. रस्ता बंद असल्याने तो कठुआहून थेट त्याच्या गावी धग्गरला जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने हिमाचलमार्गे जाण्याचा निर्णय घेतला.
आधी गुलशन पत्नीचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेने निघाला आणि हिमाचलमार्गे मश्का येथे पोहोचला. मात्र रस्ता खराब असल्याने येथून पुढचा एकूण ३५ किलोमीटराच मार्ग त्याने पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊनच पार केला. मश्का आणि पेपडी गावादरम्यान रस्त्यावर दगड पडले आहेत. तिथून बाहेर पडणे कठीण झाले होते. मुस्लिम समाजातील लोकांनी मृतदेहाला खांदा देऊन तेथून बाहेर पडण्यास मदत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.