आसाम : 'बकरी ईद'च्या पार्श्वभूमीवर आसाममधील धुबरी शहरात धार्मिक तणाव निर्माण झाला आहे. ७ जून रोजी एका मंदिराजवळ गायीचे कापलेले शिर आढळल्याने वातावरण ढवळून निघाले. या घटनेनंतर कठोर पावले उचलत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा (CM Himanta Sarma) यांनी सुरक्षादलांना दगडफेक करणाऱ्यांना दिसताच गोळी घालण्याचे आदेश दिले आहेत.