esakal | 'भाजपचा पराभव हे एकच लक्ष्य; त्याग करण्याचीही तयारी'
sakal

बोलून बातमी शोधा

bjp flag

ते म्हणाले की, भाजपला राज्यातून निरोप देण्यासाठी आम्ही त्याग करण्याच्या मनःस्थितीत आहोत. आम्ही काही तडजोडी करू आणि २४ तासांमध्ये जागावाटप नक्की करून तो तपशील जाहीर करू.

'भाजपचा पराभव हे एकच लक्ष्य; त्याग करण्याचीही तयारी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी - Assam Assembly Election 2021 आगामी विधानसभा निवडणूकीसाठी महाआघाडीने भारतीय जनता पक्षाचा पराभव करणे हे एकमेव लक्ष्य ठेवले आहे, असे अखिल भारतीय संयुक्त लोकशाही आघाडीचे (युडीएफ) प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांनी सांगितले. महाआघाडीमध्ये जागावाटपाचा प्रश्न उद्भवणार नाही, असा दावाही करून ते म्हणाले की, भाजपला राज्यातून निरोप देण्यासाठी आम्ही त्याग करण्याच्या मनःस्थितीत आहोत. आम्ही काही तडजोडी करू आणि २४ तासांमध्ये जागावाटप नक्की करून तो तपशील जाहीर करू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आसामच्या जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. हाच निवडणुकीचा मुख्य मुद्दा असेल, असेही त्यांनी नमूद केले.

आश्वासनांची खैरात करताना ते म्हणाले की, सत्तेवर आल्यास चहाच्या मळ्यांमधील वंचित मजुरांना मदत, सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तिका या समस्या सोडवू.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बांगलादेशींचा मुद्दा
अजमल यांनी कोणत्याही अवैध बांगलादेशी व्यक्तीला आसाममध्ये राहू दिले जाणार नाही, असा दावा केला. ते म्हणाले की, संशयास्पद मतदार ही आसाममधील मोठी समस्या आहे. ती आम्ही सोडवू. भाजपने त्यांना पाठिंबा दिला असेल, पण आम्ही तसे करणार नाही.

महागाई, नोकऱ्यांचा उल्लेख
मोदी यांच्यावर आणखी टीका करताना अजमल म्हणाले की, बेरोजगारीचा दर उच्चांकी झाला आहे. डाळ, तांदूळ, फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. देशभरात दोन कोटी नोकऱ्या निर्माण करू असे मोदी यांनी जाहीर केले होते, पण आजवर त्यांना एकालाही नोकरी देता आलेली नाही.

ताज्या घडामोडी वाचण्याासाठी क्लिक करा

स्वतःच्या मतदारसंघाचा उल्लेख
राज्यातील आरोग्य क्षेत्राची दुर्दशा झाल्याचे नमूद करताना अजमल यांनी सांगितले की, तेराशे व्यक्तींमागे एक डॉक्टर आणि तीन हजार व्यक्तींमागे एक परिचारिका असायला हवी, पण तशी स्थिती नाही. धुबरी या माझ्या मतदारसंघात १८ लाख लोकांमागे एकही स्त्रीरोगतज्ज्ञ नाही.

पुर, शिक्षणाचे मुद्दे
अजमल यांनी पुर आणि शिक्षण या मुद्द्यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पुराचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आसाममध्ये शांतता नांदू शकत नाही. आम्ही त्यासाठी प्रयत्न करू. आज आसामच्या मुलांना शिक्षणासाठी बाहेर जाणे भाग पडत आहे. याचे कारण सरकारने शैक्षणिक संस्था उभारल्या नाहीत.

loading image