Assam Floods : पाणी ओसरायला सुरवात, नागरिक अडकलेलेच, सुमारे अडीच लाख जणांना फटका
Flood Relief : आसाममधील पूरस्थिती कायम असून सहा जिल्ह्यांना फटका बसला आहे. २.६ लाखांहून अधिक नागरिक अजूनही त्रस्त आहेत आणि पुरामुळे कामरूप जिल्ह्यात आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या २६ झाली आहे.
गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती ‘जैसे थे’ असून राज्यातील सहा जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी ओसरायला सुरूवात झाली असली तरी, एकूण २.६ लाख नागरिक अद्यापही पुरामुळे त्रस्त आहेत.