आसाममधील मदरसे होणार बंद; फसवणुकीने होणाऱ्या हिंदू-मुस्लिम विवाहांनाही आळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

राज्य सरकारच्या तिजोरीतील पैशांद्वारे चालवले जाणारे सगळे मदरसे बंद करण्यात येणार आहेत.

आसाम : राज्याद्वारे चालवले जाणारे सगळे मदरसे आता नियमित शाळांमध्ये बदलले जातील आणि आसाममधील मदरसे बंद केले जातील, अशी माहिती आसाम राज्याचे आरोग्य आणि शिक्षणमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, राज्य सरकारच्या तिजोरीतील पैशांद्वारे चालवले जाणारे सगळे मदरसे बंद करण्यात येणार आहेत. ते आता नियमित शाळांमध्ये बदलले जाणार आहेत. याबाबतची सुचना येत्या नोव्हेंबरमध्ये काढण्यात येईल, अशीही माहीती त्यांनी दिली. 

हेही वाचा - 'आरजेडीची सत्ता आली तर दहशतवाद्यांना काश्मीरपेक्षा बिहार जवळचा वाटेल'

ते पुढे म्हणाले की, माझ्यामते, कुराणबाबतचे शिक्षण देणे हे राज्याच्या पैशांतून होता कामा नये. जर आपल्याला हे करायचे असेल तर आपल्याला बायबल आणि भगवतगीता देखील शिकवली पाहीजे. म्हणजेच आपल्याला एकतर याबाबत समानता आणली पाहीजे किंवा हे बंदच केलं पाहीजे. त्यांच्या या वक्तव्यावर आता वाद निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यांनी एवढीच माहीती दिली नाही तर त्यांनी मुस्लिम धर्मीय तरुणांबाबत आणि हिंदू-मुस्लिम विवाहाबाबतही काही वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. 

ते म्हणाले की, अनेक मुस्लिम मुले हिंदू नावांनी आपले फेसबुक अकाऊंट उघडतात आणि मंदिरासमोरील आपला फोटो त्यावर पोस्ट करतात. जेंव्हा एखादी मुलगी अशा एखाद्या मुलाशी लग्न करते, त्यानंतर तिला कळतं ती तो तिच्या धर्माचा नाहीये. हा खरा विवाह तर नाहीचय पण हा विश्वासघात आहे. 
या प्रकरणाबाबत आपण कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. 

हेही वाचा - Bihar Election:बिहार निवडणुकीत नेपोटिझम; नेत्यांकडून कुटुंबीयांना उमेदवारीची खिरापत

राज्य सरकारने यावर कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. आम्ही असा प्रयत्न करत आहोत की येत्या पाच वर्षांत विवाह स्वेच्छेने होतील आणि कोणत्याही  प्रकारच्या फसवणुकीचे  प्रकार घडणार नाहीत. आम्ही अशाप्रकारच्या विवाहाविरोधात लढा देऊ जे फसव्या आधारावर उभारले गेले आहेत, असं ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: assam government to close madrassas & fight against hindu muslim fraud basis marriage