Assam govt announces employees  special leave to spend time with parents and in-laws marathi news
Assam govt announces employees special leave to spend time with parents and in-laws marathi news

Assam govt : सरकारी कर्मचाऱ्यांना आसाम सरकार देतंय दोन दिवसांची खास सुट्टी! कारण ऐकून म्हणाल व्वा...

Assam govt News : पालक किंवा सासू-सासरे नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना या रजेचा लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट केले आहे.

गुवाहाटी : दररोजच्या कामाच्या व्यापामुळे नोकरदारांना आपल्या पालकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. नेमकी हीच समस्या ओळखून आसाम सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना पालक किंवा सासरच्या मंडळींसोबत वेळ घालविण्यासाठी दोन दिवसांची विशेष प्रासंगिक रजा घोषित केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबद्दल ‘एक्स’वरील पोस्टद्वारे माहिती दिली.

पालक किंवा सासू-सासरे नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना या रजेचा लाभ मिळणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने येत्या सहा व आठ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आपले पालक किंवा सासू-सासऱ्यांना वेळ देता यावा, म्हणून दोन दिवसांच्या विशेष प्रासंगिक रजेची घोषणा केली आहे. केवळ पालक किंवा सासू-सासऱ्यांबद्दल आदर, त्यांची काळजी घेण्यासाठीच ही रजा वापरण्यात येईल. कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कारणासाळी ही रजा वापरता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले आहे.

Assam govt announces employees  special leave to spend time with parents and in-laws marathi news
Worli Hit And Run Case: "माझं करिअर संपलंय..."; आरोपी मिहीर शहाने पोलिसांना सांगितला संपूर्ण घटनाक्रम!

बिहारमध्ये येत्या सात नोव्हेंबर रोजी छटपूजेची सुटी आहे. त्याचप्रमाणे, नऊ तारखेला दुसऱ्या शनिवारची सुटी असून १० नोव्हेंबरला रविवार आहे. या सुट्ट्यांना जोडून ही विशेष रजा मिळणार आहे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांना सलग पाच दिवस पालक किंवा सासू-सासऱ्यांना देता येऊ शकतील. अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने रजा वापरता येईल.मुख्यमंत्री सरमा यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनादिवशी, २०२१ मध्ये या रजेची घोषणा केली होती.

Assam govt announces employees  special leave to spend time with parents and in-laws marathi news
Actress Robbed In Europe: गाडीची काच फोडून कोट्यवधींचं सामान लंपास; पतीसह परदेशात अडकली अभिनेत्री, मायदेशी परतण्यासाठी मागतेय मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com